शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Satara News | नीरा नदीपात्रात उडी मारून २४ वर्षीय युवतीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 21:29 IST

युवकांचे प्रसंगावधान व पोलिसांची तत्परता यामुळे वाचले प्राण

मुराद पटेल

शिरवळ: पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावरील सातारा-पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या सारोळा पुलावरुन नीरा नदीपात्रात सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील जाखणगाव येथील २४ वर्षीय युवतीने उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी युवकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने, किकवी पोलीस व शिरवळ पोलीस व शिरवळ रेस्क्यू टिमच्या सदस्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे संबंधित युवतीला नीरा नदीपात्रातून बाहेर काढत खांद्यावर घेत तत्काळ पुणे जिल्ह्यातील किकवी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या बाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की,पुणे,निगडी येथील एका खाजगी कंपनीमध्ये नौकरीला असलेली सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील जाखणगाव येथील 24 वर्षीय युवती बुधवार दि.28 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान आली होती.दरम्यान,संबंधित युवतीबरोबर आणखी कोणी होते का ? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

यावेळी संबंधित युवतीने अचानकपणे सारोळा पुलावर चढत नीरा नदीपाञात उडी मारल्याचे त्याठिकाणी उपस्थित असलेले युवक बंटी उर्फ सौरभ धाडवे-पाटील,शुभम दळवी,साईनाथ धाडवे-पाटील,हर्षद बोबडे,मनोज पांगारे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबतची माहिती तत्काळ किकवी पोलीस दुरक्षेञाचे पोलीस अंमलदार गणेश लडकत,राजेंद्र चव्हाण व शिरवळ रेस्क्यू टिमचे मुराद पटेल,साहिल काझी,सलमान काझी तसेच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संजय सकपाळ,सचिन शेलार यांना दिली.

यावेळी किकवी पोलीस दुरक्षेञाचे पोलीस अंमलदार गणेश लडकत,राजेंद्र चव्हाण यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णवाहिका चालक तुळशिराम अहिरे यांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेत युवकांनी धाडस दाखवित नीरा नदीमध्ये बुडणा-या संबंधित युवतीला नदीपाञातून बाहेर काढत बेशुद्ध झालेल्या युवतीला खांद्यावर घेत तत्काळ रुग्णवाहिकेतून किकवी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी शुध्द हरपलेल्या युवतीला शुध्दीवर आणण्यात यश मिळविले.यावेळी या घटनेची माहिती युवतीच्या कुंटूंबियांना देत किकवी पोलीसांनी संबंधित युवतीला कुंटूंबियांच्या स्वाधीन केले.दरम्यान,संबंधित 24 वर्षिय युवतीने सारोळा पुलावरुन नीरा नदीपाञात उडी मारुन आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केला याचा उलगडा होऊ शकला नाही.

युवकांचे प्रसंगावधान...पोलिसांची तत्परता!

सातारा-पुणे जिल्ह्याला जोडणा-या सारोळा पुलावरुन २४ वर्षिय युवतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता नीरा नदीमध्ये बुडणा-या युवतीला प्रसंगावधान दाखवित बंटी उर्फ सौरभ धाडवे-पाटील,शुभम दळवी,साईनाथ धाडवे-पाटील,हर्षद बोबडे,मनोज पांगारे या युवकांनी तसेच तत्काळ किकवी पोलीस दुरक्षेञाचे पोलीस अंमलदार गणेश लडकत,राजेंद्र चव्हाण व शिरवळ रेस्क्यू टिमचे मुराद पटेल,साहिल काझी,सलमान काझी तसेच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संजय सकपाळ,सचिन शेलार,रुग्णवाहिका चालक तुळशिराम अहिरे यांनी युध्दपातळीवर शर्थीचे प्रयत्न केल्याने युवतीचा जिव वाचविण्यात यश आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर