शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दगडाने मारहाण करुन पंधरा वर्षीय मुलाचा खून

By संजय पाटील | Updated: April 21, 2024 21:50 IST

कऱ्हाडातील घटना : मारहाणीत भाऊ गंभीर जखमी; दोघांना अटक

कऱ्हाड : किरकोळ वादातून पंधरा वर्षीय मुलाला दगडाने मारहाण करुन त्याचा खून करण्यात आला. तर आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मुलाचा भाऊ गंभीर जखमी झाला. विमानतळ कऱ्हाड येथे रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून अटक केले आहे.

अल्तमस अहमद खान (वय १५, सध्या रा. वारुंजी, ता. कऱ्हाड, मुळ रा. उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. जखमी निजामुद्दीन अहमद खान याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी सचिन रामा भिसे (वय २०, वारुंजी, ता. कऱ्हाड) व बाळू लक्ष्मण चव्हाण (वय ३१, रा. मुंढे, ता. कऱ्हाड) या दोघांना गुन्हे शाखेने अटक केले आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश राज्यातील निजामुद्दीन खान हा कऱ्हाडातील एका भंगारच्या दुकानात कामाला असून तो वारुंजी गावात भाडेतत्वावर खोली घेवून राहतो. त्याच्याजवळच त्याचा लहान भाऊ अल्तमस हा राहण्यास होता. सोमवारी दोघेही त्यांच्या गावी जाणार होते. रविवारी दुपारी दोघेही खोलीवर असताना बाहेरून फेरफटका मारुन येण्याचा विचार करुन दोघेही खोलीबाहेर पडले. कऱ्हाड-पाटण महामार्गाच्या फुटपाथवरुन चालत ते विमानतळ येथे मुंढे गावच्या स्वागत कमानीजवळील एका किराणा दुकानासमोर पोहोचले. त्यावेळी सचिन भिसे व बाळू चव्हाण हे दोघेजण त्याठिकाणी आले. त्यांचा किरकोळ कारणावरुन अल्तमस याच्याशी वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपींनी रस्त्यावर पडलेले दगड उचलून अल्तमेशला मारहाण केली. त्यावेळी भाऊ निजामुद्दीन हा अल्तमेशला वाचविण्यासाठी आला असताना आरोपींनी त्यालाही दगडाने मारहाण केली. या मारहाणीत डोक्याला अंतर्गत गंभीर इजा झाल्यामुळे अल्तमेशचा जागीच मृत्यू तर निजामुद्दीन गंभीर जखमी झाला.घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेत जखमी निजामुद्दीनला उपचारार्थ रुग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के. एन. पाटील यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तसेच गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून अटक केले. 

टॅग्स :satara-acसातारा