चक्रीवादळाने ९०८ गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:41 AM2021-05-18T04:41:48+5:302021-05-18T04:41:48+5:30

- तौक्ते चक्रीवादळाचा महावितरण कंपनीला देखील जबर तडाखा बसला. सातारा जिल्ह्यातील दीडशेहून अधिक विजेचे खांब वादळी वाऱ्यामुळे तुटून पडले. ...

908 villages in darkness due to cyclone | चक्रीवादळाने ९०८ गावे अंधारात

चक्रीवादळाने ९०८ गावे अंधारात

Next

- तौक्ते चक्रीवादळाचा महावितरण कंपनीला देखील जबर तडाखा बसला. सातारा जिल्ह्यातील दीडशेहून अधिक विजेचे खांब वादळी वाऱ्यामुळे तुटून पडले.

- वीज वाहिन्या तुटल्याने रविवारी जिल्ह्यातील जवळपास २ लाख ४ हजार ३९८ ग्राहकांचा वीजपुरवठा रविवारी खंडित झाला होता. तर सोमवारी देखील महाबळेश्वर, जावळी खोऱ्यातील अनेक गावे अंधारात होती.

- महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेतले. यानंतर जिल्ह्यातील ९०८ पैकी ७२३ गावांचा वीजपुरवठा सोमवारी सुरळीत करण्यात आला.

- उच्चदाब वाहिन्यांवरील पाणीपुरवठा योजना देखील बंद पडल्या होत्या. त्यातील ९७ योजना तात्काळ सुरु करण्यात आल्या. तर इतर योजना सुरु करण्याचे काम सोमवारी युद्धपातळीवर सुरु होते.

- महावितरणच्या कायम १ हजार ११ व कंत्राटी १५७६ अशा एकूण २ हजार ५८७ कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक संकटाचा सामना करीत दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे.

- एकूणच वादळी वाऱ्याचा महावितरणला कोट्यवधीचा फटका बसला.

चौकट

महाबळेश्वरमध्ये नदी नाल्यांना अचानक पूर

वाईमध्ये झाडे पडली दरडी कोसळल्या

मलकापूरात चक्रीवदाळासह संततधार पाऊस

वाठार स्टेशन परिसरात वीज गायब, फळबागांचे नुकसान

कोरेगाव तालुक्यातील पाणी योजना बंद

खटाव तालुक्यात तुरळक पण समाधानकारक पाऊस

कास धरणातील पाणी साठा दीड फुटाने वाढला

मसूरमध्ये विद्यृत तारा तुटल्या, झाडे पडली, ग्रीन हाऊसचे नुकसान

मायणीमध्ये घरांचे पत्रे गेले उडून

Web Title: 908 villages in darkness due to cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.