शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

Satara- तापोळा-बामणोली परिसर विकासासाठी ९०० कोटींचा निधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

By नितीन काळेल | Updated: April 26, 2023 13:36 IST

कोकण-पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या पुलाचे काम लवकरच सुरू होणार

सातारा : पर्यटनक्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत. यासाठीच तापोळा, बामणोली परिसरातील रस्त्यांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात येत आहे. लवकरच कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा बामणोली-दरे पुलाचे काम सुरू होणार आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच तापोळा, बामणोली परिसर विकासासाठी ९०० कोटींचा निधी दिल्याचेही त्यांनी सांगितले.तापोळा, ता. महाबळेश्वर येथे तापोळा-महाबळेश्वर रस्त्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता संतोष रोकडे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘तापोळा ते महाबळेश्वर रस्ता अरुंद असल्याने वाहनचालकांना अनेक अडचणी येत असतात. या अडचणीमुळे काही पर्यटक तापोळा भागात येणे टाळत होते. पण, आता हा रस्ता रुंद आणि मजबूत करण्यात येत आहे. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक तापोळा भागात येईल. या रस्त्याचे भूमिपूजन माझ्या हस्ते होत असल्याचा आनंद आहे. लोकांनीही पर्यटनाच्यादृष्टीने व्यवसाय वाढवावा. तापोळा, बामणोलीचा परिसर निसर्गसंपन्न आहे. याचा विकास करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.तापोळा, बामणोली परिसराच्या विकासासाठी सुमारे ९०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून बामणोली दरे पुल, आपटी तापोळा पुल, आहेरी तापोळा पुल यासह विविध रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. या परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यात येत आहे. पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र निर्माण होईल असा या परिसराचा विकास होणार आहे. या दुर्गम भागातील तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही. असा या परिसराचा विकास केला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.दरम्यान, यावेळी महाबळेश्वर-तापोळा रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणसाठी ७५ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्री