शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये ९० टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:48 PM

सातारा : जिल्ह्याच्या पश्मि भागात १५ दिवसांपासून संततधार कायम असल्याने धरणांतील साठा झपाट्याने वाढू लागला आहे. जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणे परिसरात गतवर्षीपेक्षा अधिक १७०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे या सर्व धरणांमध्ये सध्या ९० टीएमसी साठा झाला आहे. गेल्यावर्षी तो ६० टीएमसी इतका होता. तर यावर्षी ५७६६ मिलीमीटर इतका पाऊस ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्मि भागात १५ दिवसांपासून संततधार कायम असल्याने धरणांतील साठा झपाट्याने वाढू लागला आहे. जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणे परिसरात गतवर्षीपेक्षा अधिक १७०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे या सर्व धरणांमध्ये सध्या ९० टीएमसी साठा झाला आहे. गेल्यावर्षी तो ६० टीएमसी इतका होता. तर यावर्षी ५७६६ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कोसळत आहे. या पावसाचा जोर कायम असल्याने ओढे, नाले खळाळू लागले आहेत. तर भात लागणीच्या कामाला वेग आला आहे. बुधवारी रात्रीपासून तर पावसाचा जोर आणखी वाढला आहे. सततच्या या पावसामुळे पश्चिम भागात गेल्या १५ दिवसांत सूर्यदर्शन झालेच नाही. लोकांनाही घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. पावसाची अशीच संततधार सुरू राहिल्यास पश्चिम भागातील सर्व धरणे गतवर्षीपेक्षा लवकर भरतील, अशी स्थिती आहे.यावर्षी वेळेत पाऊस सुरू झाल्याने पावसाने गतवर्षीची आकडेवारी ओलांडली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा अधिक पाऊस झाला आहे. गतवर्षी १५ जुलैपर्यंत धरण परिसरात ४०३७ मिलीमीटर पाऊस झाला होता. तर यंदा तो ५७६६ मिलीमीटरपर्यंत पोहोचला आहे. या पावसामुळे धरणातील साठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गतवर्षी प्रमुख सहा धरणात ६०.०६ तर आता ८८.०३ टीएमसी इतका साठा आहे. हा साठा गतवर्षीपेक्षा जवळपास ३० टीएमसीने अधिक आहे.सातारा शहरातही सतत पाऊस...रविवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरणात ६४.९२ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ३८ हजार २६५ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. यंदा गतवर्षीपेक्षा लवकरच धरणात ६० टक्के साठा निर्माण झाला आहे. तर जिल्ह्यातील इतर धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. बलकवडी येथे ६६, उरमोडी ३१ आणि तारळी धरण परिसरात ८९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच सातारा शहरातही जोरदार पाऊस होत असून, सर्वत्र पाणी पाणी होत आहे.धरण परिसरातील यावर्षीचा एकूण पाऊस,साठा आणि गेल्यावर्षीचा पाऊस व साठा(सर्व माहिती मिलीमीटर आणि टीएमसीमध्ये)यावर्षी गतवर्षीधोम ३७५ मिमी ६.१४ टीएमसी २६१ मिमी ४.३८ टीएमसीकण्हेर ३८० ५.३८ २५४ ३.६४कोयना २३६० ६४.९२ १७३९ ४२.४३बलकवडी ११२५ २.५५ ९२५ १.७५उरमोडी ५३० ५.८० ४०० ५.३५तारळी १००६ ३.२४ ४५८ २.५१