शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, नऊ दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:16 IST

शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करुन दोन युवकांसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली. या चोरट्यांकडून चोरीच्या तब्बल नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या दुचाकींची किंमत १ लाख ६३ हजार इतकी आहे.

ठळक मुद्देदुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, नऊ दुचाकी जप्त शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

सातारा : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करुन दोन युवकांसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली. या चोरट्यांकडून चोरीच्या तब्बल नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या दुचाकींची किंमत १ लाख ६३ हजार इतकी आहे.विकास मुरलीधर मुळे (वय १९, रा.पावर हाउस झोपडपट्टी, मंगळवार पेठ, सातारा), बाळा उर्फ सुरज किसन सकटे (वय २२, रा.सातारा रोड ता.कोरेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.गेल्या काही दिवसांमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.

त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अशा घटनांना आळा घालण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शाहूुपरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जोरदार मोहीम हाती घेतली होती.

याच दरम्यान साताऱ्यातील एका युवतीने पोलिसांना संशयितांची माहिती दिली होती. पोलीस संशयितांचा शोध घेत असताना ते राजवाडा येथे दुचाकीवर आढळले. पोलिसांनी थांबण्यासाठी सांगितल्यानंतर ते दुचाकीवरुन पळून जाऊ लागले.

पोलिसांनी संशयितांचा थरारक पाठलाग करुन तिघांना पकडले. दुचाकीबाबत विचारले असता, ते निरूत्तर झाले. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातून तब्बल ९ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व दुचाकी त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत.पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, हवालदार लैलेश फडतरे, अमीत माने, अधिकराव खरमाटे, सचिन माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, मोहन वाघमळे, अमर काशीद, मिना गाढवे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. मौजमस्तीसाठी चोरी..अटक केलेल्या संशयितांकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित तिघे चोरटे केवळ मौजमस्तीसाठी दुचाकी चोरत होते. वेगवेगळ्या गाड्या चोरून त्या चालविण्याची हौस भागवत होते. त्यांच्याकडे नेहमी नवीन दुचाकी असायची. याची शंका एका युवतीला आल्याने तीने हा प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. तेंव्हा या टोळीचे बिंग बाहेर पडले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर