सातारा जिल्ह्यात ८३० नवे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:57+5:302021-06-24T04:26:57+5:30

सातारा : जिल्ह्यात बुधवारी ८३० नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून १६ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यामध्ये एकूण ११ हजार ८१९ ...

830 newly affected in Satara district | सातारा जिल्ह्यात ८३० नवे बाधित

सातारा जिल्ह्यात ८३० नवे बाधित

Next

सातारा : जिल्ह्यात बुधवारी ८३० नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून १६ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यामध्ये एकूण ११ हजार ८१९ कोरोना तपासण्या करण्यात आल्या, रुग्णवाढीचा दर ७.०२ टक्के इतका झाला आहे.

सातारा तालुक्यातील रुग्णांची संख्या पुन्हा वाढलेली पाहायला मिळत असून बुधवारी तब्बल २२४ रुग्ण आढळले आहेत. सातारा आणि कऱ्हाड या दोन तालुक्यांमध्ये अजूनही चिंताजनक परिस्थिती पाहायला मिळते. जिल्ह्यातील इतर तालुक्यात कोरोनावाढीचा दर घसरत असला तरीदेखील सातारा आणि कऱ्हाड या दोन तालुक्यांमध्ये मात्र अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही. महाबळेश्वर, खंडाळा आणि जावली या तालुक्यामध्ये रुग्णांची संख्या मर्यादित असल्यामुळे प्रशासनाची चिंता कमी झालेली आहे. सातारा, कऱ्हाड या तालुक्यांमध्ये प्रशासनाला विशेष लक्ष द्यावे लागत आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ८७ हजार ८८९ इतकी झाली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ४ हजार २५५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जावली, कऱ्हाड, खटाव, पाटण, फलटण, माण या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली. वाई तालुक्यात दोघा जणांना जीव गमवावा लागला. महाबळेश्वर, खंडाळा या तालुक्यांमध्ये मृत्यूची नोंद झाली नाही. सातारा तालुक्‍यात तब्बल पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. तालुक्यातील एकूण मृत्यूंची संख्या १ हजार २०१ इतकी झालेली असून तालुक्यामध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे.

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत ६७४ जणांना घरी सोडण्यात आले. विविध रुग्णालयांमध्ये ८ हजार ५९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

चौकट..

सातारा जिल्ह्यात एकूण १० लाख १० हजार ४४९ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामधून १ लाख ८७ हजार ८८९ रुग्ण बाधित आढळून आले. प्रशासनातर्फे कोरणा चाचण्यांमध्येदेखील वाढ करण्यात आलेली आहे.

Web Title: 830 newly affected in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.