शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कऱ्हाडच्या कृष्णाकाठी ८२ प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास

By संजय पाटील | Updated: December 21, 2024 17:27 IST

अभ्यासकांकडून गणना : स्थानिक पक्ष्यांचे थवे, स्थलांतरितांच्या जोड्याही आढळल्या

संजय पाटीलकऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाडच्या कृष्णाकाठी ८२ प्रजातींच्या शेकडो पक्ष्यांचा वावर असल्याचे निरीक्षकांच्या अभ्यासातून समोर आले आहे. निरीक्षकांनी याबाबतच्या नोंदी घेतल्या आहेत. त्यामध्ये अनेक स्थानिक पक्ष्यांसह स्थलांतरित पक्षीही मोठ्या प्रमाणावर नोंदले गेले आहेत.कऱ्हाड परिसराला मुबलक जैवविविधता लाभली आहे आणि याच जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असलेल्या पक्ष्यांचे निरीक्षण करून डॉ. सुधीर कुंभार यांच्यासह त्यांच्या टीमने नोंदी केल्या आहेत. कऱ्हाडजवळ कृष्णा नदीवरील खोडशी धरण परिसर, प्रीतिसंगम बाग, विद्यानगर, कृष्णा पूल, वाखाण परिसर, टेंभू प्रकल्प येथे हे निरीक्षण व नोंदी केल्या आहेत.निरीक्षणाबाबत डॉ. सुधीर कुंभार यांनी सांगितले की, कऱ्हाड परिसरात मोर, लांडोर, पाणकावळे, पाकोळ्या, सूर्यपक्षी व सुगरण या पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तसेच सुगरणींच्या घरट्यांची संख्याही वाढली आहे. वेडाराघू, लाल मैना, वटवट्या, ट्रायकलर, सुभग, हळद्या, मिनीवेट, तांबट, पिंगळे, गव्हाणी घुबड यांचीही नोंद झाली आहे.सत्तरहून अधिक घारी..कऱ्हाड परिसरात पक्षी निरीक्षकांना सत्तरहून अधिक नागरी घारी दिसल्या आहेत. उंच झाडांवर या घारींचे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे.निरीक्षकांनी नोंदवलेले पक्षी (कंसात संख्या)रंगीत करकोचे (२२), पांढऱ्या मानेचे करकोचे (१२), पांढरा अवाक (२०), काळा शराटी (२१), नदी सुरय (२८), स्पून बिल (१८), पिवळा, पांढरा, राखाडी धोबी (५३), शेकाटी (६), चक्रवाक (८), किंगफिशर (११), नीलकंठ (८), हळदीकुंकू बदक (१०३), ब्राह्मणी घार (७), शिक्रा (३), कापशी घार (२), ससाणा (१), जंगल मैना (१२०).एकाच ठिकाणी दोनशेहून जास्त बगळेनव्या कृष्णा पुलानजीक एकाच ठिकाणी दोनशेहून जास्त बगळे निरीक्षकांना आढळले. नाइट हेरॉन, जांभळे व राखी बगळे परिसरात आहेत. पांढऱ्या पोटाच्या पाणकोंबड्या, जांभळ्या पाणकोंबड्या, छोटे कार्मोरंट, राखी धनेश, पाणटिटव्याही खोडशी ते वाखाणपर्यंतच्या नदीकाठावर असल्याचे अभ्यासक राजेंद्र कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराड