शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

पंचायत समित्यांची ८ सभापतिपदे राखीव

By admin | Updated: January 19, 2017 23:12 IST

महिलांसाठी सहा : महाबळेश्वर, कोरेगाव, खटाव खुले; जि. प.च्या अनेक सदस्यांना तालुक्यात परतीचे वेध

सातारा : जिल्ह्यातील महाबळेश्वर, कोरेगाव व खटाव वगळता इतर आठ पंचायत समित्यांची सभापतिपदे राखीव झाली आहेत. गुरुवारी झालेल्या सोडतीमध्ये अनेक दिग्गज इच्छुकांची संधी चिठ्ठीने हिरावून घेतली, तर अनेकांना तालुक्यात परतण्याचे वेध लागले. जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापतिपदाची सोडत गुरुवारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, तहसीलदार विवेक जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवनात काढण्यात आली. आपल्या तालुक्यात कोणते आरक्षण पडते? हे पाहण्यासाठी जिल्हाभरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महाबळेश्वर, कोरेगाव व खटाव तालुक्यांत आरक्षण खुले पडले असल्याने या तालुक्यातील मातब्बर मंडळींना संधी मिळणार आहे. साताऱ्याचे सभापती इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. कऱ्हाडचे सभापतिपद इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. पाटणला सर्वसाधारण महिला, जावळीला सर्वसाधारण महिला, वाईत सर्वसाधारण महिला, फलटणला सर्वसाधारण महिला, माणमध्ये अनुसूचित जाती, खंडाळ्यात इतर मागास प्रवर्ग असे सभापतिपदाचे आरक्षण पडले आहे. (प्रतिनिधी)माणचे त्रांगडे सुटले!माणचे सभापतिपद आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती महिलेसाठी पडले होते. मात्र, तालुक्यातील दहा गणांत हे आरक्षणच नाही. त्यामुळे सभापती निवडणार कसा? हे त्रांगडे झाले. सोडतीवेळी काही मंडळींनी त्यावर आक्षेप घेतला. त्यावर मार्डी गटात अनुसूचित जातीचे आरक्षण आहे. या परिस्थितीत सभापतिपद रिक्त राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सभापतीचे आरक्षण महिला राखीवऐवजी अनुसूचित जाती, असे करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. तालुकानिहाय या गणांना सभापतिपदाची संधीसातारा : दरे खुर्द, नागठाणे (इतर मागास प्रवर्ग)कऱ्हाड : मसूर, येळगाव, कार्वे (इतर मागास प्रवर्ग महिला)पाटण : चाफळ, सणबूर, तारळे, नाटोशी, कुंभारगाव (सर्व स्त्री)महाबळेश्वर : वाडाकुंभरोशी (सर्वसाधारण)जावळी : सायगाव, म्हसवे (सर्वसाधारण महिला)कोरेगाव : पिंपोडे बुद्रुक, वाठार किरोली, कुमठे, एकंबे (सर्वसाधारण)वाई : भुर्इंज, शेंदूरजणे (सर्वसाधारण महिला)फलटण : साखरवाडी, तरडगाव, हिंगणगाव, पाडेगाव (सर्वसाधारण महिला)खटाव : मायणी, औंध, बुध, कातरखटाव (सर्वसाधारण)माण : मार्डी (अनुसूचित जाती)खंडाळा : नायगाव (इतर मागास प्रवर्ग)