शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

७५ वर्षांचा माणदेशी उसेन बोल्ट; या आजोबांचा वेग पाहून 'येडे' व्हाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 16:56 IST

नियमित सराव करणाऱ्या खेळाडुंनाही 100 मीटर अंतर पार करण्यासाठी साधारणपणे 13 सेकंदांचा अवधी लागतो.

सचिन मंगरुळे/ म्हसवड (सातारा ): वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू उसेन बोल्टच्या तोडीची कामगिरी म्हसवड येथील ७५ वर्षीय मुसा दादूभाई मुल्ला करत आहेत. नियमित सराव करणाऱ्या खेळाडुंनाही 100 मीटर अंतर पार करण्यासाठी साधारणपणे 13 सेकंदांचा अवधी लागतो. मात्र, मुल्ला या वयातही 50 मीटरचे अंतर 9 सेकंदात पार करतात. त्यांच्या वयाच्यादृष्टीने ही कामगिरी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. माण तालुक्यात विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणारी नररत्ने जन्मली आहेत. जगाच्या पातळीवर सातासमुद्रापार माण तालुका व म्हसवडचे नाव पोहोचवलेल्या ऑलिम्पिकपटू ललिता बाबर, चेतना सिन्हा यांच्यासह राज्य व देशपातळीवर प्रशासन सेवेत माणचा ठसा उमटविणारे अनेक अधिकारी व विविध क्रीडा प्रकारांत नवीन उद्योन्मुख खेळाडुंनी माण तालुक्याचे नाव सर्वदूर पोहोचवले आहे. मुसा यांच्या अंगात उपजतच वेगाने धावण्याचे कौशल्य होते. मात्र, त्यांच्या धावण्याचा सरावाकडे फारसं कोणाचं लक्ष नव्हतं. पूर्वी जी मंडळी रोज यांचा सराव बघायची त्यातली बरीच मंडळी या म्हाताऱ्याला वेड लागलंय का? असं म्हणायची. तीच मंडळी आज त्यांचं कौतुक करतायत. मुसाभाई मुल्ला यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले जुने बी. कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी माण तालुका बाजार समितीत नोकरी केली. आता ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. ते ७५ वयाच्या असले तरी व्यायाम व नियमित धावण्याचा सराव करतात. माण नदी किनारी असणाऱ्या बायपास रस्त्यावर सायंकाळी धावण्याचा सराव करतात. सध्या त्यांच्या धावण्याचं आणि रेकॉर्डब्रेक वेळेचे विशेष कौतुक होत आहे. 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनSportsक्रीडा