शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कराडमध्ये ७२ वर्षांच्या आजोबांची धाव!, पाच किमी अंतर ३२ मिनिटांत केले पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 16:00 IST

विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत त्यांची नातवंडे अरहान शेख आणि इनाया शेख यांनीही धावत स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.

कोपर्डे हवेली : वयाच्या ७२ व्या वर्षीही फिटनेस आणि उत्साह कायम ठेवत सर्वांना प्रेरणा देणारी कामगिरी कराड येथे आयोजित ‘आरटीओ रन फॉर रोड सेफ्टी’ स्पर्धेत पाहायला मिळाली. विद्यानगर सैदापूर येथील रहिवासी दस्तगीर शेख यांनी पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेत अवघ्या ३२ मिनिटांत हे अंतर पूर्ण केले. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत त्यांची नातवंडे अरहान शेख आणि इनाया शेख यांनीही धावत स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.या स्पर्धेत दस्तगीर शेख हे सर्वात वयस्कर धावपटू ठरले. वयाच्या या टप्प्यावरही त्यांनी दाखवलेली ऊर्जा आणि जिद्द सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि शिस्तबद्ध दिनक्रम यामुळेच अनेकांची शारीरिक क्षमता टिकून राहते. त्यांच्या या प्रेरणादायी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजमाध्यम तसेच विविधस्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. वय असले तरी ते मानण्यावर असते. हे शेख यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.सहाशे किलोमीटरचा प्रवास दस्तगीर शेख व्यायामच्या बाबतीत कायमच चर्चेत असतात. २०१९ ला ते मुंबई येथील उद्धव ठाकरे यांच्या शपथ विधीसाठी दुचाकीवरून सामाजिक कार्यकर्ते मोहन चव्हाण यांच्याबरोबर गेले होते. ३६ तासांत त्यांनी आरत परतचा एकाच वेळी सहाशे किलोमीटरचा प्रवास केला होता. त्यावेळी कोपर्डे हवेली ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला होता.

मी दररोज नियमित व्यायाम करतो. संतुलित आहार घेतो आणि दिवसभर पुरेसे पाणी पितो. तसेच वेळोवेळी डोंगर-गडांची सैरही करतो. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. - दस्तगीर शेख, धावपटू

English
हिंदी सारांश
Web Title : 72-year-old runs 5km in 32 minutes, inspires in Karad!

Web Summary : Dastagir Sheikh, 72, completed a 5km run in 32 minutes at Karad. He ran with his grandchildren. His fitness and dedication inspire many. He maintains his health through regular exercise and a balanced diet, and once traveled 600km by bike.