शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात नऊ नगरपालिकांच्या २३३ जागांसाठी ७१२ उमेदवार रिंगणात, १३ उमेदवार बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:12 IST

Local Body Election: शेवटच्या दिवशी दिग्गजांसह अपक्षांच्या तलवारी म्यान; एकनाथ शिंदे यांच्या भगिनी राष्ट्रवादीत...

सातारा : सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुकीचे राजकीय रणमैदान अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पूर्णपणे मोकळे झाले. नऊ पालिकांमधून नगरसेवक व नगराध्यक्षपदाच्या मातब्बर व अपक्ष उमेदवारांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. आता नगरसेवक पदाच्या अंतिम लढाईत ७१२, तर नगराध्यक्ष पदासाठी ४३ उमेदवार रिंगणात आहेत. राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी (दि. २१) शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी गर्दी झाली. नऊ नगरपालिकांच्या २३३ जागांसाठी एकूण १ हजार ५१२, तर नगराध्यक्षपदाच्या ९ जागांसाठी १०४ उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारांना दि. १९ ते २१ या कालावधीत अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती.पहिले दोन दिवस नाममात्र तर शेवटच्या दिवशी अनेक मातब्बरांनी निवडणुकीच्या रणांगणातून तलवारी म्यान केल्या. नऊ नगरपालिकांच्या २३३ नगरसेवक पदांसाठी आता ७१२ उमेदवार शिल्लक राहिले असून, या निवडणुकीत कुठे दुरंगी, कुठे तिरंगी तर कुठे राजकीय पक्षांमध्ये घमासान पाहायला मिळणार आहे. मेढा नगरपंचायतीत १७ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणार आहेत.

१३ उमेदवार बिनविरोध...सातारा पालिकेच्या प्रभाग १३ मधून एका अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपचे उमेदवार विनोद खंदारे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. तर प्रभाग १२ अ मधून सर्व अपक्षांनी माघार घेतल्याने येथे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचे शिलेदार दिलीप म्हेत्रे बिनविरोध झाले. मलकापुरात भाजपच्या रंजना पाचुंदकर, वाईत राष्ट्रवादीच्या रेखा कांताराम यांनीदेखील बिनविरोधची पताका फडकविली. आता मलकापुरात सहा, साताऱ्यात तीन तर वाई दोन आणि मेढा नगरपंचायतीत दोन अशा एकूण १३ उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

एकनाथ शिंदे यांच्या भगिनीचा राष्ट्रवादीत...उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानलेली बहीण असलेल्या विमल ओंबळे यांची जबाबदारी स्थानिक नेते कुमार शिंदे यांच्याकडे सोपवली होती; परंतु दोन दिवसांपूर्वीच कुमार शिंदे यांनी अचानक त्यांचा पाठिंबा काढून प्रतिस्पर्धी विमल बिरामणे यांच्याशी हातमिळवणी केली. ही बाब ओंबळे यांनी उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घातली. मात्र, तिकडूनही अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्या नाराज होत्या. अखेर त्यांनी मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश जाहीर केला, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत.साताऱ्याच्या लढतीकडे लक्ष...सातारा पालिकेत नगराध्यक्षपदाची निवडणूक ‘भाजप विरुद्ध महाविकास’ आघाडी अशी होणार आहे. तरीही एकूण नऊ उमेदवार एकमेकांना आव्हान देणार आहे. येथे नगरसेवकपदाच्या ५० जागांसाठी एकूण १६९ उमेदवार रिंगणात उरले असून, येथील लढती लक्षवेधी होणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Municipal Elections: 712 Candidates Fight for 233 Seats

Web Summary : Satara municipal elections see 712 candidates vying for 233 seats across nine municipalities. Thirteen candidates are unopposed. Political realignments are occurring, with key figures switching parties, intensifying the competition, especially in Satara city where a BJP vs. Mahavikas Aghadi contest is expected for the president post.