शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

७ जनावरांचा मृत्यू: वीज पडून एक शेतकरीही ठार; शेतीचे कोटीत नुकसान

By नितीन काळेल | Updated: April 19, 2023 19:45 IST

वळवाने २१ कुटुंबांना केले बेघर..

सातारा : जिल्ह्यात एप्रिल महिना सुरू झाल्यापासून सतत जोरदार वाऱ्यासह वळवाचा पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे शेती पिके आणि फळबागांचे कोटीत नुकसान झाले. गेल्या १० दिवसांत तर जिल्ह्यातील २१ कुटुंबांना वळवाने बेघर केले. तसेच ७ जनावरांचा मृत्यू झाला असून वीज पडून एक शेतकरीही ठार झाला आहे.

जिल्ह्यात दरवर्षीच जानेवारी महिन्यानंतर अवकाळी आणि वळवाचा पाऊस पडतो. यावर्षी मार्च महिन्याच्या मध्यावर अवकाळी पाऊस पडला. याचा फटका तीन तालुक्यातील शेतीला फटका बसला. यामध्ये ८५ लाख ७३ हजार रुपयांचे पीक आणि बागांचे नुकसान झालेले. यातून बळीराजा सावरत असतानाच एप्रिल महिन्यात वळवाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मागील ११ दिवसांत तर ८ वेळा जोरदार वाऱ्यासह वळीव जिल्ह्यात कोठे ना कोठे बरसला आहे. त्यातच गारपीट होत आहे. यामुळे पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होत आहे. तर वाऱ्यामुळे घरे, शाळांवरील पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या. तसेच वीज पडूनही नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात ८ एप्रिलपासून आतापर्यंत वळवाच्या पावसाने २१ घरांची पडझड झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील सर्वाधिक १० घरांचा समावेश आहे. तर वाई तालुक्यात ७, फलटण आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी दोन घरे बाधित झाली आहेत. त्याचबरोबर लहान ३ आणि मोठ्या चार जनावरांचा मृत्यू झालाय. यातील ५ जनावरांचा खटाव तालुक्यात तर वाई आणि फलटण तालुक्यात प्रत्येकी एक पशुधन दगावले आहे. त्याचबरोबर जावळी तालुक्यात पावसामुळे ७ कोंबड्यांचाही मृत्यू झालाय. तर कोरेगाव तालुक्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.यावर्षी अवकाळीपेक्षा आताच्या वळवाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. यामध्ये पिके, फळबागा आणि पशुधनाचाही समावेश आहे. आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदत लवकर द्यावी, अशी मागणी केली आहे.

वळवात फळबागांचेच अधिक नुकसान...जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस होऊन दीड हजार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. यामध्ये रब्बी हंगामातील पिकांचा समावेश अधिक होता. कारण, त्याचवेळी शेतकऱ्यांची पीक काढणी आणि मळणी सुरु होती. त्यामुळे बाधित शेतकरी अधिक आणि नुकसान कमी राहिले. पण, आता वळवात पिकांपेक्षा फळबागांचे नुकसान अधिक झाले आहे. फळबागांचे नुकसान अधिक राहते. तसेच शासनाकडून मदतही पिकांपेक्षा जादा मिळत असते.

टॅग्स :satara-acसाताराFarmerशेतकरी