शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तपासणीविना धावतायत ६७ स्कूलबस-सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 20:33 IST

कोल्हापूर येथे एका स्कूलबसचा अपघात झाल्यानंतर स्कूलबसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रथम दंडात्मक, जप्ती आणि न्यायालयीन कारवाई अशा कारवाईच्या बडग्यानंतरही सातारा शहरासह जिल्'ात विद्यार्थी

सातारा : कोल्हापूर येथे एका स्कूलबसचा अपघात झाल्यानंतर स्कूलबसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रथम दंडात्मक, जप्ती आणि न्यायालयीन कारवाई अशा कारवाईच्या बडग्यानंतरही सातारा शहरासह जिल्'ात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ६७ बसेस अवैधरीत्या तपासणीविना फिरत आहेत. या बसेसवर कडक कारवाई करण्याची मोहीम उपप्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केली आहे.

 

कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर चोकाक येथे मंगळवारी कंटेनर आणि स्कूलबसची धडक होऊन तीनजण ठार तर २४ जण जखमी झाले होते. या अपघातानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने तातडीने बेकायदा विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू केली. याची राज्य शासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, राज्यभरात स्कूलबसवर कारवाई चालू करण्यात आली आहे.सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे एकूण ५५२ स्कूलबसची नोंद आहे. त्यापैकी सुमारे ४८५ बसेसने तपासणी करून आपले फिटनेस सर्टिफिकेट घेतले आहे. मात्र, अद्याप ६७ बसेस तपासणीविना रस्त्यावर धावत आहेत. अशा बसचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.वाहनचालकांविरुद्ध पोलिसांची कारवाईसातारा शहरात ग्रेड सेपरेटरच्या बांधकामामुळे वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलीस प्रशासनानेही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांविरुद्ध मोहीम सुरू करून वाहनचालकांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम वसूल केली.शासनाच्या सूचना न आल्याने तपासणी शिबिर नाहीउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशनानुसार वर्षापूर्वी राज्यातील सर्व स्कूलबससाठी मे महिन्यात शिबिराचे आयोजन करून त्यांची तपासणी केली होती. मात्र, यावर्षी शासनाकडून तशा सूचना न आल्याने प्रशासनाने यंदा तपासणी शिबिराचे आयोजन केले नाही. परिणामी काही बसेस तपासणीविना रस्त्यावर धावत आहेत. 

सातारा जिल्हा स्कूलबस असोसिएशन व काही शाळांच्या मागणीनुसार बसचे लॉट करून सुटीच्या दिवशी कºहाड येथे काही स्कूलबसची तपासणी केली होती. ज्या स्कूलबसने तपासणी केली नाही. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.-संजय धायगुडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSchoolशाळा