शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हा परिषदेसाठी ६५ गट; ओबीसींसह आरक्षण पडणार

By नितीन काळेल | Updated: June 13, 2025 19:25 IST

जुन्या रचनेनुसार निवडणूक होणार 

नितीन काळेल सातारा : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, आता २०१७मधील निवडणुकीतील प्रभाग रचना विचारात घेऊन कार्यवाही होणार आहे. यामुळे निवडणूक पूर्वीच्याच गट आणि गण रचनेनुसार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सातारा जिल्हा परिषदेचे ६५ गट आणि जिल्ह्यातील १३० गणांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये ओबीसी आरक्षणही पडणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. मागील महिन्यात न्यायालयाने ओबीसींना आरक्षण देऊन चार महिन्यांत निवडणुका घ्याव्यात, असा आदेश दिला होता. त्यानुसार राज्य शासनाच्यावतीने निवडणुका घेण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूकही सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये होणार आहे.यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने आदेश काढून गट आणि गण रचनेविषयी सूचना केली आहे. सातारा जिल्हा परिषदेसाठी ६५ गटांमध्ये निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात पंचायत समितीचे १३० गण राहणार आहेत. यासाठी २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना विचारात घेऊन कार्यवाही करावी लागणार आहे. यासाठी वेळ लागणार आहे.आरक्षण पुन्हा पडणार; गट-गणात बदल होणारमुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे असताना गट आणि गणांची संख्या वाढविण्यात आली होती. त्यावेळी जिल्ह्यात ७३ गट आणि १४६ गण झाले होते. याचे आरक्षणही जाहीर झालेले. पण, आता २०२२ची रचना असणार नाही. त्यामुळे आरक्षण पुन्हा पडणार आहे. तसेच गट आणि गणातही अदलाबदल होणार आहे.