शिक्षकांचे पालिकेकडे येणे बाकी होते. याबाबत पालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी थकीत रक्कम न मिळाल्यास पालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता. गटनेते राजेंद्र यादव यांनी संघटना पदाधिकारी व मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची तातडीने बैठक आयोजित करून थकीत ६१ लाख रुपये दोन दिवसात देण्याचे मान्य केले. याबाबत नगरसंचालक कार्यालयाकडून अनुदान प्राप्त झाले असून, सर्व थकीत रक्कम अदा करण्यात येणार आहे. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील यांनी यासाठी सहकार्य केले. बैठकीस आरोग्य समितीचे सभापती विजय वाटेगावकर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान, निशांत ढेकळे, एल. बी. गवळी, अरविंद पाटील, अविनाश भोसले, संग्राम गाढवे, विक्रम सपकाळ, सचिन माने, अरुण महामुनी, धोंडिराम चपडे व नामदेव कुरमुडे उपस्थित होते.
शिक्षकांच्या पगाराचे ६१ लाख मंजूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:45 IST