शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या ६१ तक्रारी, कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 14:24 IST

राज्यात सोयाबीन बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातही ६१ तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्या आहेत. यामधील सर्वच शेतकऱ्यांच्या बांधावर तक्रार निवारण समितीने जाऊन पाहणी केली. यामधील १० शेतकऱ्यांना संबंधित दुकानदारांकडून बदलून बियाणे देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या ६१ तक्रारी, कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक १० जणांना बियाणे दिले बदलून; ५१ तक्रारधारकांना पैसे मिळण्याची शक्यता

सातारा : राज्यात सोयाबीन बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातही ६१ तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्या आहेत. यामधील सर्वच शेतकऱ्यांच्या बांधावर तक्रार निवारण समितीने जाऊन पाहणी केली. यामधील १० शेतकऱ्यांना संबंधित दुकानदारांकडून बदलून बियाणे देण्यात आले. उर्वरित ५१ तक्रारधारकांना पैसे मिळण्याची शक्यता असून, यात सर्वाधिक तक्रारी कऱ्हाड तालुक्यातील आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामातील क्षेत्र ३ लाख हेक्टरहून अधिक आहे. सोयाबीन, भात, बाजरी आणि ज्वारी ही पिके या हंगामात मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. तर खरिपात सोयाबीनचे क्षेत्र ५० हजार हेक्टरच्या आसपास आहे. बहुतांशी शेतकरी या खरीप हंगामावरच अवलंबून असतात. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने हा हंगाम महत्त्वाचा ठरतो. खरिपात शेतकऱ्यांची बियाणे आणि खताबाबत फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभाग सज्ज आहे. या अंतर्गत कृषी दुकानांची तपासणी करून कारवाईही करण्यात आली आहे.मान्सूनचा पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली होती. सोयाबीनचीही पेरणी सुरू आहे. पण, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या. आतापर्यंत ६१ तक्रारी आल्या असून, यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील सर्वाधिक ३३आहेत. साताऱ्यांतील १७ आहेत. तर वाई तालुक्यातून १० तक्रारी आल्या.

सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार येताच कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून माहिती घेतली. त्यातील १० जणांना बियाणे बदलून देण्यात आले आहेत. पूर्वी घेतलेल्या दुकानातूनच हे बियाणे कृषी विभागाने मिळवून दिले.

५१ तक्रारीबाबत सबंधित कंपनी कार्यालयाला प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना पैसे मिळतील. तर चार ठिकाणच्या केसेस कोर्टात सादर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.खोलीवर बियाणे...उन्हाळा झाल्यानंतर यावर्षी लवकर पाऊस झाला. शेतकऱ्यांनी आणखी पावसाची वाट न पाहता सोयाबीनची पेरणी केली. असे असलेतरी उष्णतेत सोयाबीन उगवत नाही. त्यामुळे उगवण नसल्याच्या तक्रारी सुरुवातीला आल्या. तर काही ठिकाणी ट्रॅक्टरने पेरणी केलेल्या ठिकाणचे बियाणे खोलवर गेले. तेथील बियाणे उगवणीला मार बसला. पण, बैलांच्या साह्याने पेरणी झालेल्या ठिकाणी सोयाबीन उगवण चांगली झाल्याचे कृषी विभागाच्या पाहणीत समोर आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर