४0 डिग्रीतही झाले ६0 टक्के मतदान; जिल्ह्यातील मतदारांनी दाखवला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:30 PM2019-04-23T23:30:36+5:302019-04-23T23:30:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क । सातारा: सातारा लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी मतदान पार पाडले. जिल्ह्यात पारा वाढला असतानादेखील मतदारांचा उत्साह ...

 60 percent voting in 40 degrees; The voters in the district showed excitement | ४0 डिग्रीतही झाले ६0 टक्के मतदान; जिल्ह्यातील मतदारांनी दाखवला उत्साह

४0 डिग्रीतही झाले ६0 टक्के मतदान; जिल्ह्यातील मतदारांनी दाखवला उत्साह

Next


लोकमत न्यूज नेटवर्क । सातारा: सातारा लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी मतदान पार पाडले. जिल्ह्यात पारा वाढला असतानादेखील मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून मंगळवारी मतदान केले. ४0 अंश सेल्सिअसवर पारा गेला असताना सातारा मतदार संघात सरासरी ६0 टक्के मतदानाची नोंद झाली. मतदानाची अंतिम अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जारी केल्यावर या टक्केवारीत काहीअंशी बदल होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताऱ्यात राष्ट्रवादी काँगे्रसचे उदयनराजे भोसले व शिवसेनेचे नरेंद्र पाटील तर माढ्यामध्ये भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर व राष्ट्रवादी काँगे्रसचे संजय शिंदे यांच्यात मुख्य लढत असल्याचे चित्र होते.
उमेदवारांच्या विजयासाठी पक्षांनी शक्ती पणाला लावल्याचे पाहायला मिळाले. निवडणुकीत पहिल्यांदाच ‘ईव्हीएम’सोबतच ‘व्हीव्हीपॅट’चा वापर करण्यात आला. काही ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड तर काही ठिकाणी ‘व्हीव्हीपॅट’च्या ‘स्लीप’ न दिसणे यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली होती. मतदार यादीतील घोळामुळे मतदारांची तारांबळ उडाली. काही मतदार मतदानापासून वंचित राहिले.
या घटनांमुळे निवडणूक यंत्रणेचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले. मात्र, कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे दोन्ही मतदार संघात कुठलीही अनुचित घटना घडली नाही व शांततेत मतदान पार पडले.
जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दुपारच्या सुमारास मात्र चढलेल्या पाºयाने मतदारांना घाम फोडला. ऊन कमी झाल्यानंतर मतदारांची पावले मतदान केंद्रांकडे वळली.
साताºयात २०१४ च्या तुलनेत सुमारे जवळपास ४ टक्के अधिक मतदान जास्त झाले. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही कमी मतदान होईल की काय, अशी चर्चा सगळीकडे होती. परंतु तरुणांनी उत्साह दाखवल्याने ही चर्चा अखेर फोल ठरली.
लग्नापूर्वी पार पाडले राष्ट्रीय कर्तव्य
वाई तालुक्यातील बावधन येथे राहणारे शिवराज देवराम ठोंबरे (वय २४) हे सैन्यदलात कार्यरत आहेत. मंगळवार, दि. २३ रोजी त्यांचा विवाहसोहळा कोपर्डे येथे पार पडला. विवाहाला जाण्यापूर्वी त्यांनी बावधन जिल्हा परिषद शाळेतील केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. यानंतर वºहाडी मंडळींसह ते विवाह सोहळ्यासाठी कोपर्डे येथे निघून गेले. शिवराज ठोंबरे यांनी लग्नापूर्वी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. मतदान हा आपला अधिकार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे गरजेचे आहे.


प्रत्येक निवडणुकीत त्यांनी केले मतदान
१९५२ सालापासून साताºयात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मत देऊन शहरातील ९० ते ९४ वर्षीय दाम्पत्य असलेल्या जागरुक मतदारांनी एक अनोखा आदर्श प्रस्थापित केला आहे. पांडुरंग मारुती संकपाळ (वय ९४) व शकुंतला संकपाळ (वय ९०) दाम्पत्यानी उपनगरातील गोडोलीत मतदान केले. तसेच माण तालुक्यातील लतिका शिवराम कुलकर्णी, कºहाड तालुक्यातील हरपळवाडी येथील गुणाबाई काळभोर तर जावळी तालुक्यातील मामुर्डी येथील वेणुबाई धनवडे यांनी मतदान केले.

Web Title:  60 percent voting in 40 degrees; The voters in the district showed excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.