जिल्ह्यात ५३ हजार कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:40 AM2021-01-19T04:40:49+5:302021-01-19T04:40:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण हळूहळू वाढत असून, सोमवारी नवीन ४४ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ...

53,000 corona free in the district | जिल्ह्यात ५३ हजार कोरोनामुक्त

जिल्ह्यात ५३ हजार कोरोनामुक्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण हळूहळू वाढत असून, सोमवारी नवीन ४४ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांचा आकडा ५५ हजार ६५९वर पोहोचला, तर ११२ जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत ५३ हजार ९२ जण कोरोनामुक्त झाले तसेच ३५४ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाने रविवारी रात्री जाहीर केल्यानुसार ६६ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले. यामध्ये सातारा शहराबरोबरच तालुक्यातील गोजेगाव, पाटखळ आदी ठिकाणी, तर कऱ्हाड तालुक्यातील कार्वेनाका. पाटण तालुक्यात तेलेवाडी, सोनवडे आदी ठिकाणी नवीन रुग्ण स्पष्ट झाले. त्याचबरोबर फलटण तालुक्यातील निंभोरे, निरगुडी, विडणी, पिंपरद आदी गावांत नवीन रुग्णांची नोंद झाली.

खटाव तालुक्यात खटाव, मायणी, कलेढोण, पुसेसावळी आदी गावांत बाधित निष्पन्न झाले. माण तालुक्यातील येळेवाडी, जाशी, गोंदवले, मोही तसेच कोरेगाव, खंडाळा, जावळी तालुक्यातही नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, कोरोनाने आतापर्यंत एक हजार ८०५ जणांचा मृत्यू झाला आहे.

......................................................

Web Title: 53,000 corona free in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.