शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीसाठी दुकानदाराकडे मागितली ५० हजारांची खंडणी; ‘रयत क्रांती संघटने’च्या जिल्हाध्यक्षासह दोघांवर गुन्हा

By दत्ता यादव | Updated: November 13, 2023 12:39 IST

सातारा : भुसार माल खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानदाराला दिवाळीसाठी ५० हजारांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून ‘रयत क्रांती संघटने’च्या जिल्हाध्यक्षांसह दोघांवर सातारा ...

सातारा : भुसार माल खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानदाराला दिवाळीसाठी ५० हजारांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून ‘रयत क्रांती संघटने’च्या जिल्हाध्यक्षांसह दोघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. जिल्हाध्यक्ष मधुकर एकनाथ जाधव (सध्या रा. कोयना सोसायटी, सदर बझार, सातारा, मूळ रा. कोरेगाव), हणमंत बाबूराव साबळे (रा. शिवथर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रसन्ना राजमाने (रा. आरळे, ता. सातारा) यांचे आरळे, ता. सातारा येथे स्वामी समर्थ ट्रेडर्स नावाचे भुसार माल खरेदी-विक्रीचे दुकान आहे. डिसेंबर २०२१ मध्ये दुकानदार राजमाने यांना संशयित मधुकर जाधव यांनी फोन करून दिवाळीसाठी आम्हाला ५० हजार रुपये द्या, अशी मागणी केली होती. त्यावेळी राजमाने यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्येही राजमाने यांना फोन करून पुन्हा पैशाची मागणी करण्यात आली. ‘तुझ्याविरुद्ध आम्ही बाजार समितीत बोगस मालाबाबत तक्रा करू,’ अशी धमकी दिली. त्यामुळे राजमाने यांनी त्यांच्या पत्नीच्या फोन-पे मोबाइलवरून १० हजार रुपये त्यांना पाठविले. त्यानंतर संशयित दोघे पुन्हा आले नाहीत.दरम्यान, ८ नोव्हेंबर २०२३ रोजी बाजार समितीमधून सचिन मोरे यांनी फोन करून ‘तुमच्याविरुद्ध मधुकर जाधव यांनी तक्रार केली आहे. तुम्ही येथे या,’ असे राजमाने यांना सांगितले. राजमाने हे बाजार समितीत गेले असता तेथे वरील दोघे संशयित होते. राजमाने मोरे यांना भेटल्यानंतर त्यांनी मालाच्या पावत्यांवर व्यवस्थित सह्या करा, असे सांगितले. याचवेळी मधुकर जाधव व हणमंत साबळे यांनी राजमाने यांच्याकडे दिवाळीसाठी पुन्हा ५० हजारांची खंडणी मागितली. या प्रकारानंतर राजमाने यांनी घरी जाऊन त्यांच्या पत्नीला हा प्रकार सांगितला. पत्नी योगिता राजमाने यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

दुकानासमोर आरडाओरडही..खंडणी देण्यास नकार दिल्याने संशयितांनी ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता दुकानासमोर जाऊन राजमाने यांना शिवीगाळ केली. ‘तुम्ही ग्राहकांना फसवता, तुम्ही दुकान कसे चालविता तेच बघतो,’ अशी धमकी दिल्याचे राजमाने यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी