शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

ब वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी मिळणार पाच कोटी, राज्य शासनाचा निर्णय

By सचिन काकडे | Updated: December 15, 2023 18:47 IST

खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती

सातारा : शासनाने ब वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी असणारी २ कोटी निधीची मर्यादा वाढवून ५ कोटी रुपये इतकी केली आहे. या वाढीव मर्यादेचा लाभ राज्यातील सुमारे ४५० हून अधिक ब वर्ग तीर्थक्षेत्रांना मिळणार आहे. या निर्णयाबद्दल राज्यशासनासह ग्रामविकास आणि पर्यटनमंत्री गिरिष महाजन यांचे अभिनंदन व्यक्त करतो, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची २ कोटींची मर्यादा सरसकट ५ कोटी रुपये करण्यात यावी अशी मागणी, मंत्री गिरिष महाजन यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबतचे लेखी निवेदनही त्यांना देण्यात आले होते. राज्यातील काही ब वर्ग तीर्थक्षेत्रांना यापूर्वी २ कोटीपेक्षा जादा निधी देण्यात आला आहे. तीर्थक्षेत्र हे ग्रामस्थांसह भाविकांची श्रध्दास्थाने आहेत, त्यांच्या विकासात दुजाभाव न करता, सर्वच ब वर्ग तीर्थक्षेत्रांना किमान ५ कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी आमची मागणी होती.या मागणीनुसार शासनाने धोरणात्मक निर्णय घेत राज्यातील ब वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्याची मर्यादा ५ कोटी रुपये केली आहे. राज्यातील सुमारे ४५० पेक्षा जास्त ब वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरीता एक ठोस आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आल्याने राज्यशासनाचे आभार मानतो, असेही पत्रकात नमूद केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTempleमंदिरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले