शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
2
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
3
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
4
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
5
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
6
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
7
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
8
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
9
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
10
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
11
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी!
12
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
13
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
14
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
15
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
16
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
17
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
18
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
19
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
20
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट

LokSabha2024: साताऱ्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५४.१ टक्के मतदान

By सचिन काकडे | Updated: May 7, 2024 16:19 IST

गोडोली येथील हे मतदान केंद्रावर मतदार राजाला बांबूची रोपे भेट देण्यात येत होती

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी सात पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. काही ठिकाणी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला तर काही ठिकाणी उन्हामुळे निरुत्साह दिसून आला.  सायंकाळी 5 वाजेपर्यंत सातारा लोकसभा मतदार संघात सरासरी 54.1 टक्के मतदान झाले. सातारा शहरात मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली. प्रत्येक मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे दुपारपर्यंत कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सातारा शहरातील मतदान केंद्रांवर वैद्यकीय मदत कक्ष, दिव्यांग कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. गोडोली येथील हे मतदान केंद्र बांबू उत्पादने आणि त्याचे उपयोग या थीमवर सजवण्यात आले होते. येथे मतदान करणाऱ्या मतदार राजाला बांबूची रोपे भेट देण्यात येत होती. राजवाडा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमधील मतदान केंद्रालाही वाचन समृद्धी मतदान केंद्र असे नाव देण्यात आले होते. या मतदान केंद्राच्या माध्यमातून 'मतदान करणारे पाऊल समृद्ध लोकशाहीची चाहूल', 'वाचता वाचता मिळते ज्ञान करू शंभर टक्के मतदान' असे संदेश देऊन मतदारांमध्ये जागृती करण्यात आली. उन्हाची तीव्रता कमी होताच शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी हळूहळू वाढू लागली.उमेदवारांची नावे मतदार यादीत शोधून त्यांना वोटिंग स्लिप देण्यासाठी मतदान केंद्रांच्या बाहेर बूथ उभारण्यात आले होते. त्यामुळे मतदारांना कोणत्याही त्रासाविना आपला हक्क बजावता आला. महाबळेश्वरात सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला. शहरातील ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर नागरिकांनी रांगा लावून मतदान केले. जिल्ह्यात दुपारी तीन पर्यंत 43.83 टक्के मतदान झाले होते.

तालुकानिहाय सायं ५ वाजेपर्यंतची आकडेवाडी 

वाई मतदारसंघात 51.9 टक्के, कोरेगाव 57.21, कराड (उत्तर) 54.89, कराड (दक्षिण) 56.99, पाटण 50.3, सातारा 53.55  टक्के मतदान झाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदान