शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात 'नो फ्लेक्स झोन'मध्ये फ्लेक्स लावणाऱ्यांना ४० हजारांचा दंड, कारवाईवेळी कर्मचाऱ्याला दमदाटी

By सचिन काकडे | Updated: February 6, 2024 19:07 IST

सातारा : सातारा पालिकेने नो फ्लेक्स झोनमध्ये फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून, पहिल्याच दिवशी चार फ्लेक्स जप्त करण्यात ...

सातारा : सातारा पालिकेने नो फ्लेक्स झोनमध्ये फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून, पहिल्याच दिवशी चार फ्लेक्स जप्त करण्यात आले. तसेच फ्लेक्स लावणाऱ्यांना प्रत्येकी दहा हजारांच्या दंडाची नोटीसही बजावण्यात आली. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून मंगळवारी दुपारी १२ वाजता पोवई नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी फलक उतरविताना एका कार्यकर्त्याकडून कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्नही केला; परंतु पथकाने कोणताही मुलाहीजा न ठेवता ही कारवाई केली. सातारा पालिकेने शहरातील पाच ठिकाणे नो फ्लेक्स झोन म्हणून जाहीर केली आहेत. यामध्ये पोवई नाक्याचादेखील समावेश आहे. तरीदेखील प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता काही मंडळींकडून या परिसरात मोठ-मोठे फ्लेक्स लावले जात होते. या फ्लेक्समुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व परिसराचे विद्रुपीकरण होत होते. फ्लेक्स लावण्यास मज्जाव केल्यास पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली जात होती. असे प्रकार सातत्याने वाढू लागल्याने प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी कठोर पावले उचलली असून, नो फ्लेक्स झोनमध्ये फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना अतिक्रमण निर्मूलन पथकाला दिल्या आहेत.प्रशासनाकडून नो फ्लेक्स झोनबाबत मंगळवारी रितसर नोटीस जाहीर करण्यात आली. तरीदेखील काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व व्यावसायिकांकडून पोवई नाक्यावर चार ठिकाणी फ्लेक्स उभारण्यात आले. या प्रकाराची माहिती मिळताना अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन चारही फलक जप्त केले. फलक उतरविताना एका कार्यकर्त्याकडून कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्नही केला; परंतु पथकाने कोणताही मुलाहीजा न ठेवता ही कारवाई केली. तसेच फ्लेक्सधारकांना प्रति दहा हजार रुपये दंडाची नोटीसही बजावली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर