शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोयना धरणात ४०.९४ टीएमसी साठा; कण्हेर, उरमोडीतून विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:48 IST

वेण्णा नदीवरील पुलांवरून पाणी जाण्याची शक्यता

सातारा : जिल्ह्यात मंगळवारीही पावसाचा जोर कायम राहिला. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नवजा, कोयनानगर व महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणात २१ हजार क्युसेक आवक होत असल्याने चोवीस तासात अडीच टीएमसीने साठा वाढला आहे. मंगळवारी सायंकाळी ५ पर्यंत धरणात ४०.९४ टीएमसी पाणीसाठा झाला. कोयना धरणात दि. २३ रोजी ३८.३३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.जिल्ह्याच्या संततधार पश्चिम भागात धुवाधार पाऊस सुरू आहे. कण्हेर आणि उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पाऊस व धरणामध्ये पाण्याची आवक होत आहे. यामुळे कण्हेर धरण व्यवस्थापनाने मंगळवारी सायंकाळी ७:३० वाजता सांडव्यावरील विसर्गात १००० क्युसेकने विसर्गात वाढ करून वेण्णा नदी पात्रात ४ हजार क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वेण्णा नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ झाली आहे.त्याचप्रमाणे उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कास तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पाऊस सुरूच असल्याने व धरणामध्ये येणारा येवा लक्षात घेता, उरमोडी धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मंगळवारी दुपारी १२ पासून जलविद्युत प्रकल्पातून उरमोडी नदीपात्रात पाचशे क्युसेक विसर्ग सुरू केला आहे.

वेण्णा नदीवरील पुलांवरून पाणी जाण्याची शक्यताकण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे या नदीवरील पुलावर असलेल्या हामदाबाज-किडगाव आणि करंजे-म्हसवे येथील पूल पाण्याखाली गेला आहे. गावांचा संंपर्क तुटला आहे. प्रशासनाने नागरिकांना या पुलाऐवजी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, अशा सूचना केल्या आहेत.

जिल्ह्यात १६.१ पाऊसजिल्ह्यात पावसाचा मंगळवारी जिल्ह्यात संततधार सुरू होती. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १६.१ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली. सातारा १२.७, जावली ४६.६, पाटण २७.३, कऱ्हाड १०.४, कोरेगाव ७.४, खटाव २.७, माण १.४, फलटण ०.७, खंडाळा ५.७, वाई १७.२, महाबळेश्वर ९५.८ असा पाऊस झाला.