शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळून सातारा जिल्ह्यात वर्षभरात 'इतक्या' जणांचा गेला जीव, संरक्षणासाठी 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 12:55 IST

शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात वीज कोसळून गेल्या वर्षभरात चार जणांचा मृत्यू झाला. याशिवाय ६ जनावरे मृत्युमुखी पडली. वळीव, मान्सून पूर्व, तसेच परतीच्या पावसाच्या वेळी विजांचा कडकडाट होतो. मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकरी आडोशाला थांबलेले असतात. मात्र, वीज कोसळून दुर्घटना होण्याचा धोका असतो. दरवर्षी वीज कोसळून दुर्घटना घडत असतात. यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.वीज पडून जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यूजिल्ह्यात गेल्या वर्षभरात वीज कोसळून चार जणांचा बळी गेला आहे. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख अशी सोळा लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. शासनाने मदत दिली असली, तरी घरचा कर्ता पुरुष कुटुंबाने गमावला आहे. यामुळे विजा कोसळत असताना सुरक्षित ठिकाणी घरी अथवा इमारतीत थांबावे.सहा जनावरे दगावलीवर्षभरात वीज कोसळल्याने ६ जनावरे दगावली आहेत. अनेकदा शेतकरी गुरांना झाडाला बांधत असतात. वीज झाडावर कोसळण्याची शक्यता असते. यामुळे शेतकऱ्यांनी गुरांना इतर सुरक्षित ठिकाणी बांधावे.चार जणांच्या वारसांना मिळाले प्रत्येकी चार लाखगतवर्षात जिल्ह्यात चार जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख मदत शासनाकडून मिळाली आहे.किती मिळते मदत?

  • मृत व्यक्तीच्या चार वारसांना लाख
  • मृत जनावरे गाई, म्हशी मालकांना ३० हजार
  • वासरू असेल, तर १५ हजार रुपये.

विजेपासून संरक्षण करण्यासाठी ही घ्यावी काळजी

  • कोणत्याही परिस्थिती झाडाखाली आश्रय नको
  • पाण्यात असाल तर त्वरित बाहेर यावे
  • विद्युत उपकरणाचा वापर टाळावा
  • वीज खांबाजवळ उभे राहू नका.
  • गुरांना झाडाला न बांधता इतर सुरक्षित ठिकाणी बांधा.

अनेकदा झाडावर विजा कोसळतात. पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकरी झाडाखालीच थांबतात. विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये, तसेच पाण्यात असाल, तर विजा चमकत असताना त्वरित पाण्याबाहेर यावे. - देवीदास ताम्हाणे, उपजिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर