शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

वनराई बंधारे निर्मिती; सातारा जिल्ह्यात पहिल्या दिवशी ३५५ बंधारे बांधून पूर्ण 

By नितीन काळेल | Updated: November 29, 2023 19:21 IST

गावागावांत वेग येणार अन् पाणी अडणार

सातारा : यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने राज्यात दुष्काळी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचे महत्व लक्षात घेऊन मृद व जल, पाणलोट क्षेत्र कृषी आयुक्तालयाच्या वतीने ‘एक दिवस वनराई बंधाऱ्यासाठी’ संकल्पना २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. पहिल्या दिवशी लोकसहभागातून ३५५ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. यातील १२८ पाटणमधील आहेत. तर एकूण २८५० बंधारे बांधण्यात येणार असून गुरुवारी याला वेग येणार आहे.पाणी हे पिण्यासाठी आवश्यक असते. तसेच शेतीसाठीही लागते. कारखानदारी असो किंवा अन्य क्षेत्र यासाठी कमी-अधिक फरकाने पाणी हे लागतेच. पण, एखाद्यावर्षी पाऊस कमी झाला तर त्याचे भयावह परिणामही दिसून येतात. आताही तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण, राज्यात यावर्षी पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. राज्य शासनाने उपाययोजनेचा एक भाग म्हणून ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केलेला आहे. तर त्यानंतर अनेक महसूल मंडलातही दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. पाऊस नसल्यानेच अशी स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे पाण्याचे महत्व लक्षात येते.

या अनुषंगानेच राज्य शासनाच्या मृद, जल संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयुक्तालयाच्या वतीने लोकसहभागातून वनराई बंधारे घेण्याची सूचना करण्यात आलेली आहे. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत आणि कृषी विभागानेही तयारी केलेली आहे. ग्रामविकास विभागासाठी प्रती गाव पाच वनराई बंधारे निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात २ हजार ८५० वनराई बंधारे निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवून ते पूर्णही करण्यात येणार आहेत.यासाठी दि. २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी ही संकल्पना जिल्ह्यात राबविली जात आहे. पहिल्या दिवशी बुधवारी ३५५ वनराई बंधारे बांधून पूर्ण झालेले आहेत. तसेच पाणी अडलेही आहे. आता गुरुवारीही गावागावात ही मोहीम राबविली जाणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती होणार आहे. तसेच अडलेल्या पाण्याचा फायदा शेतीसाठी होणार हे निश्चित आहे.

अवकाळीचे पाणी अडण्याचे काम होणार..या मोहिमेत गावातील सर्व ग्रामस्थांचा सहभाग राहत आहे. तसेच जिल्हा परिषद, हायस्कूल, खासगी शाळा आणि महाविद्यालयातील विद्याऱ्थी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, खासगी कंपनी, सहकारी संस्था, कारखाने आदींचा सहभाग घेऊन वनराई बंधारे बांधले जात आहेत. यामुळे सध्या अनेक ठिकाणी ओढ्यांना पाणी नाही. पण, अवकाळी पाऊस चांगला झाल्यास पाणी अडवणूक होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच या बंधाऱ्यामुळे भविष्यातही पाणी साठून राहण्याने भूगर्भातील पाण्याची पातळीही वाढणार आहे. वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणी अडविणे आणि त्याचा फायदा करुन घेणे अशीच ही संकल्पना आहे.

जिल्ह्यात ‘एक दिवस वनराई बंधारे कामासाठी’ ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखली राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून जिल्ह्यात २८५० वनराई बंधारे बांधले जाणार आहेत. हे बंधारे ओढ्यावर बांधले जाणार असल्याने अवकाळीचा पाऊस झाल्यास वाहून जाणारे पाणी अडले जाणार आहे. यामुळे जमिनीतील पाणीपातळीही वाढणार आहे. यामध्ये ग्रामस्थ, संस्थाचा सहभाग घेऊन संकल्पना यशस्वी करण्यात येईल. - विजय माईनकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी

 

वनराई बंधारे निर्मिती..तालुका - पूर्ण कामेजावळी ०५कऱ्हाड ४६खंडाळा ०६खटाव ०७कोरेगाव १०महाबळेश्वर ८३माण ०५पाटण १२८फलटण २०सातारा ३६वाई ०९

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी