शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामुळे वाचले ३५ हजार रुग्णांचे प्राण, दोन वर्षात २७५ कोटींची मदत - मंगेश चिवटे 

By सचिन काकडे | Updated: July 18, 2024 19:25 IST

सातारा : ‘राज्य शासनाने सुरू केलेल्या वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे दोन वर्षात ३५ हजार रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले ...

सातारा : ‘राज्य शासनाने सुरू केलेल्या वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे दोन वर्षात ३५ हजार रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहेत. तसेच या कक्षाद्वारे २७५ कोटीची वैद्यकीय मदतही करण्यात आली आहे,’ अशी माहिती सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.सातारा येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वैद्यकीय मदत कक्ष मृतावस्थेत होता. मात्र महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षाच्या माध्यमातून दुर्धर रोगांवरील उपचार तसेच विविध शारीरिक अवयवांचे प्रत्यारोपणाकरिता एक लाख रुपयांची मदत करण्यात येत आहे. यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र, तहसीलदार कार्यालयाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला, रुग्णांचे आधार कार्ड, लहान बाळासाठी आईचे आधार कार्ड, रुग्णाचे रेशन कार्ड ,आजाराचे रिपोर्ट, अपघातग्रस्त रुग्णांसाठी पोलिस डायरी रिपोर्ट, प्रत्यारोपणासाठी शासकीय समितीची मान्यता आणि पेपर स्कॅन करून पीडीएफ फाईल ई-मेल आयडी वर पाठवणे अशा अटींची पूर्तता करावी लागते. याशिवाय इतर आजारांसाठी सहाय्यता कक्षाच्या वतीने वीस हजार रुपयाची मदत करण्यात येते. या योजनेद्वारे महाराष्ट्रातील ३५ हजार रुग्णांचे प्राण वाचवण्यात या कक्षाला यश आले आहे.महाविकास आघाडीच्या काळात या कक्षामध्ये दोन वर्षात केवळ अडीच कोटींची मदत झाली होती. मात्र महायुतीचे शासन आल्यानंतर दोन वर्षात २७५ कोटीची वैद्यकीय मदत देण्यात आली. ‘ना वशीला.. ना ओळख.. थेट मिळते मदत’ या संकल्पनेनुसार कक्षाचे काम सुरू असून, रुग्णांनी कोणालाही मध्यस्थी न करता ८६५० ५६७ ५६७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंगेश चिवटे यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMedicalवैद्यकीयChief Ministerमुख्यमंत्री