शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

महाबळेश्वरात पर्यटकांना मिळणार ३५ रुपयांची सूट

By admin | Updated: September 16, 2016 23:45 IST

टोलनाक्यांचे एकत्रीकरण : वनव्यवस्थापन समिती आकारणार एकाच ठिकाणी १५ रुपये शुल्क

सातारा : ‘क्षेत्र महाबळेश्वर, अवकाळी, भेकवली, प्रतापगड व गुरेघर या ठिकाणी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रतिव्यक्ती १० रुपये असे ५० रुपये शुल्क आकारणी होत होती. आता ही शुल्क आकारणी एकाच ठिकाणी करण्यात येणार असून, प्रतिव्यक्ती १५ रुपये अशी एकाच ठिकाणी शुल्क आकारणी होणार असल्याने पर्यटकांना ३५ रुपयांची सूट मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या वेळेचीही बचत होणार आहे,’ अशी माहिती उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली आहे.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक एल. डी. कुलकर्णी, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, महाबळेश्वर नगरपरिषेदेचे मुख्याधिकारी आशा राऊत आदी उपस्थित होते.शासन निर्णयानुसार महाबळेश्वर वनक्षेत्रात क्षेत्र महाबळेश्वर, अवकाळी, भेकवली, प्रतापगड व गुरेघर या ठिकाणी संयुक्त व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीकडून महाबळेश्वर परिसरात व संबंधित वनहद्दीत असलेल्या दृष्य स्थानकांचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापनाचे काम करण्यात येत आहे.शासन निर्णयाच्या अनुषंगाने संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत या पाच ठिकाणी १० रुपये प्रतव्यक्ती या प्रमाणे उपद्रव शुल्क, स्वच्छता उपकर आकारण्यात आलेला आहे. परंतु महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना पाच ठिकाणी टोल देण्यासाठी थांबावे लागत होते. तसेच गिरिस्थान नगरपरिषद, महाबळेश्वर यांच्याकडूनही चार ठिकाणांवर प्रवासी करही व प्रदूषण कर वसूल करण्याकरिता जागोजागी शुल्क नाके उभारण्यात आले आहेत.या शुल्क नाक्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांचा महत्त्वाचा वेळ वाया जात होता. त्यामुळे एकाच ठिकाणी संयुक्त शुल्क नाके उभारून प्रवेश शुल्क वसूल करण्याबाबत पर्यटकांकडून वेळोवेळी सूचना प्राप्त झालेल्या होत्या. (प्रतिनिधी)वेळेची होणार बचत; आर्थिक नुकसानही टळणार‘संयुक्त वन व्यवस्थापन समित्यावरील पाच ठिकाणी १० रुपये प्रतिव्यक्ती असे पाच ठिकाणांचे ५० रुपये याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारत होते. शुल्क एकत्रीकरणानंतर महाबळेश्वरमधील वन हद्दीतील सर्व पॉइंट तसेच गुरेघर येथील त्रिवेणी पॉइंट व प्रतापगड या सर्व पॉइंटसाठी एकत्रितरीत्या १५ रुपये प्रतिव्यक्ती असे प्रवेश शुल्क एकाच ठिकाणी जमा केले जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा वेळ वाचून त्यांना पर्यटनासाठी जास्त वेळ देता येईल. तसेच आर्थिकदृष्ट्याही पर्यटकांचा फायदा होईल,’ असेही अंजनकर यांनी सांगितले.