शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघोबांचा संसार, कर्नाटकात १७, गोव्यात ५ वाघ; ‘डब्ल्यूसीटी’चा अहवाल 

By संजय पाटील | Updated: August 10, 2024 13:32 IST

महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात ३२ वाघांचा वावर असल्याची माहिती या अहवालातून समोर आली, सह्याद्री प्रकल्पात मादी वाघ पिढ्यान्पिढ्या प्रजनन करीत असल्याची नोंदही अहवालात करण्यात आली आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : सह्याद्रीला केंद्रस्थानी ठेवून ‘वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ने (डब्लूसीटी) कोल्हापूर वन विभाग आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या मदतीने तयार केलेला अहवाल कऱ्हाडमध्ये पार पडलेल्या सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात ३२ वाघांचा वावर असल्याची माहिती या अहवालातून समोर आली, सह्याद्री प्रकल्पात मादी वाघ पिढ्यान्पिढ्या प्रजनन करीत असल्याची नोंदही अहवालात करण्यात आली आहे.

प. महाराष्ट्रातील दहा वाघांच्या छायाचित्रांची नोंदअहवालानुसार गोवा व कर्नाटक राज्यातील वाघांची संख्या ही राष्ट्रीय व्याघ्र गणनेच्या अहवालामधून घेण्यात आल्याची माहिती ‘डब्लूसीटी’चे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांनी परिषदेत दिली. कर्नाटकमधील १७ आणि गोव्यातील ५ वाघांची संख्या ही राष्ट्रीय व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार नोंदवण्यात आली, तर पश्चिम महाराष्ट्रामधील दहा वाघांच्या छायाचित्रांची नोंद संशोधकांनी त्यांच्या अभ्यासातून केली आहे.

महत्त्वाचा भ्रमणमार्गसह्याद्री-कोकण भ्रमणमार्ग प्रदेशामध्ये मादी वाघ पिढ्यान् पिढ्या प्रजनन करत आहे.२०१५ साली या ठिकाणी जन्मास आलेल्या एका मादी वाघिणीने तीन पिलांना जन्म दिला आहे.मे, २०१८ रोजी सह्याद्री प्रकल्पामधील चांदोली अभयारण्यात आढळलेला टी-३१ हा नर वाघ मे २०२० साली कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पात आढळला होता.२०१८ मध्ये महाराष्ट्रात टिपण्यात आलेली टीटी ७ नामक वाघीण जवळपास चार वर्षांनंतर ३० जून २०२१ रोजी गोव्यातील म्हादई अभयारण्यात आढळली होती.

सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गातील वाघांच्या संचाराविषयी कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. राज्यांतर्गत होणाऱ्या वाघांच्या हालचालींबाबत समन्वय साधण्यासाठी लवकरच वन अधिकाऱ्यांचा गट तयार करण्यात येणार आहे. - मणिकंदन रामानुजम, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर (प्रादेशिक)

असा आहे भ्रमणमार्ग सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गाचा विस्तार १० हजार ७८५ चौरस किलोमीटर आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेकडे कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत तो पसरला आहे. 

टॅग्स :Tigerवाघkonkanकोकणforestजंगल