शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सातारकरांची चिंता वाढली, नवीन ३२ कोरोना रुग्णांची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 13:30 IST

पहिला डोस १०० टक्के पूर्ण नाही...

सातारा : जिल्ह्यात दररोजच कोरोनाचे रुग्ण वाढत असून गुरुवारच्या अहवालानुसार तर तब्बल ३२ जण बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कोरोनाचे संकट वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण होऊ पाहत आहे. तर सध्या जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या ८२ असलीतरी १० दिवसांत १२० जणांना कोरोनाने गाठले आहे.जिल्ह्यातील कोरोना संकटाला तीन वर्षे होऊन गेली आहेत. या तीन वर्षात आतापर्यंत दाेन लाख ८० हजार ८९३ जणांना कोरोनाने गाठले. यामध्ये जिल्ह्यातील बहुतांशी नागरिकांचा समावेश आहे. त्यातील सहा हजार ७३० लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यातील दोघांचा तर तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. या संकटाच्या आतापर्यंत दोन लाटा येऊन गेल्या. पहिलीपेक्षा दुसरी लाट मोठी ठरली; पण तिसरी लाट जिल्ह्यात आली.मात्र, कोरोना प्रतिबंधित लसीकरण झाल्याने लाट फारकाळ टिकली नाही. आताही कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. याची तीव्रता पहिल्या दोन लाटेसारखी नाही, अशी स्थिती आहे; पण नागरिकांना काळजी घ्यावी लागणारच आहे. कारण दररोज रुग्ण वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे प्रशासन कोरोनाकडे गांभीर्याने पाहत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्याचा मागील १० दिवसांचा विचार करता १२० जणांना कोरोनाने गाठले आहे. तर दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना रुग्ण स्पष्ट होण्याचे प्रमाण कमी-जास्त होत आहे.गुरुवारच्या अहवालानुसार ३२ रुग्ण समोर आले. हे १० दिवसांतील एकाचवेळी सापडलेली उच्चांकी रुग्णसंख्या ठरली. कारण मागील आठवड्यात दिवसांत रुग्ण सापडल्याची संख्या २, ४, ५, ७, ९, २२, २८ अशी राहिली आहे. तर जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णसंख्या ८२ इतकी झाली आहे. त्याचबरोबर नऊ जणांना उपचार करून सोडण्यात आले. सध्या ११ बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पहिला डोस १०० टक्के पूर्ण नाही...जिल्ह्यातील १२ वर्षांवरील २५ लाख २८ हजार लोकांना कोरोना प्रतिबंधित लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यातील पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या २४ लाखांहून अधिक आहे. तर दुसरा डोस २० लाखांवर लोकांचा झालेला आहे. त्याचबरोबर १८ वर्षांवरील दाेन लाखांहून अधिक लोकांनी बूस्टर डोस घेतलाय. अजूनही जिल्ह्यात कोरोना लसीचा पहिला डोस १०० टक्के पूर्ण झालेला नाही. लोकांची उदासीनता कारणीभूत ठरली आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या