शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कोयनेतून उद्या ३० हजार क्यूसेकने विसर्ग होणार

By नितीन काळेल | Updated: September 13, 2022 19:22 IST

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास धरणात १०२ टीएमसी साठा झालेला. त्यातच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत चालला आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून आणि दरवाजे दीड फुटांनी उचलून विसर्ग करण्यात येत आहे. तरीही धरणात आवक वाढत असल्याने बुधवारी सकाळी धरणाचे सहा दरवाजे साडे तीन फुटापर्यंत वर उचलण्यात येणार आहेत. त्यामुळे ३० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होणार आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरु असून आज, सकाळपर्यंत कोयनेला ११६, नवजा १४२ आणि महाबळेश्वरला १२२ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणक्षेत्रात पाऊस असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे यंदा दुसऱ्यांदा उघडून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.  दोन दिवसांत पावसाचा जोर वाढला असून पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा आणि महाबळेश्वर परिसरात दमदार पाऊस पडू लागला आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजा येथे १४२ मिलीमीटर झाला. तर कोयना धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे.सकाळच्या सुमारास धरणात १०१.५७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणात येणाºया पाण्याची आवक साडे आठ हजार क्यूसेकवर गेली होती. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारच्या सुमारास सहा दरवाजे दीड फुटाने उचलण्यात आले. त्यातून १२८९१ कुसेक तर पायथा वीजगृहातील १०५० असा एकूण १३९४१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणRainपाऊस