शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

कऱ्हाडला २७ गावे ‘हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:35 IST

कऱ्हाड : कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असून तालुक्यातील बहुतांश गावे सध्या बाधित आहेत. काही गावांमध्ये रुग्णांची साखळी निर्माण झाली ...

कऱ्हाड : कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असून तालुक्यातील बहुतांश गावे सध्या बाधित आहेत. काही गावांमध्ये रुग्णांची साखळी निर्माण झाली आहे. तब्बल २७ गावे सध्या ‘हॉटस्पॉट’ असून संबंधित गावांमध्ये दहापेक्षा जास्त ‘अ‍ॅक्टिव्ह’ रुग्ण आहेत. या गावांवर सध्या प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.

कऱ्हाड शहरात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एकीकडे लसिकरणाचा वेग प्रशासनाने वाढविला असताना बाधितांची संख्याही तेवढ्याच गतीने वाढताना दिसते. मलकापुरातही हीच स्थिती आहे. त्याठिकाणी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याबरोबरच शहराची उपनगरे असलेल्या सैदापूर, हजारमाची, कोयना वसाहत, वारूंजी परिसरातही चिंताजनक परिस्थिती आहे. सदाशिवगड आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या हजारमाची, ओगलेवाडी, बनवडी या गावांमध्ये रुग्ण वाढल्यामुळे धास्ती निर्माण झाली आहे. काले गावातील रुग्णसंख्या सध्या तीसवर पोहोचली आहे. त्यामुळे गावात शुकशुकाट पसरला आहे. उंब्रज विभागातील उंब्रजसह तासवडे गावाने प्रशासनाची चिंता वाढविली आहे.

तांबवे परिसरात सुपने वगळता इतर गावांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे. मात्र, सुपने गावात झपाट्याने रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता गावातील इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. कोळे विभागातही काही गावांमध्ये संक्रमण वाढले असून येवती विभागही कोरोनाच्या दहशतीखाली आहे.

- चौकट

एकामुळे कुटुंबच बाधित

शेरे गावामध्ये आठ ते दहा जणांचे कुटुंबच बाधित आढळून आले आहे. संबंधित कुटुंबातील एकजण दररोज कामानिमित्त कऱ्हाडला ये-जा करीत होता. त्याला त्रास सुरू झाल्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल बाधित आला. त्यानंतर कुटुंबातील सर्वांची चाचणी केली असता सर्वांचेच अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. एकामुळे कुटुंब बाधित होण्याचे शेरेतील हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. तालुक्यातील बहुतांश ठिकाणी अशीच परिस्थिती पहायला मिळत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी सांगितले.

- चौकट

दहापेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

मलकापूर : १३२

कऱ्हाड : १३९

कोयना व. : १७

काले : २९

तासवडे : २०

उंब्रज : १४

सुपने : १२

सैदापूर : ३६

हजारमाची : २३

बनवडी : १७

विरवडे : १०

कोपर्डे ह. : १३

मसूर : ११

तारूख : १२

कोळे : १३

कोळेवाडी : १२

विंग : १४

गोळेश्वर : २३

शेणोली : १३

वडगाव ह. : १५

कापील : ११

शेरे : २५

कोरेगाव : १९

कार्वे : १८

रेठरे बुद्रूक : १६

शेवाळवाडी : १७

सवादे : १२

- चौकट

गावांचा लेखाजोखा

एकूण बाधित : १८८

कोरोनामुक्त : ६६

कंटेन्मेंटमध्ये : १२१

- चौकट

कोरोना अपडेट

एकूण बाधित : १२१३२

कोरोनामुक्त : १०७०७

दुर्दैवी मृत्यू : ३६२

उपचारात : १०६३

- चौकट

चार महिन्यांतील रुग्णसंख्या

जानेवारी : ८९

फेब्रुवारी : १३८

मार्च : ५९२

एप्रिल : १४३१

(दि. १६ अखेर)

- चौकट

विभागनिहाय रुग्ण

इंदोली : ४४९

उंब्रज : ८३५

मसूर-हेळगाव : ९१९

सदाशिवगड : ११९२

कऱ्हाड : २९१२

सुपने : ६१६

कोळे : ६१९

काले : २१८७

वडगाव हवेली : १६५०

येवती : ७१४