शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

साताऱ्यात अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या चार भिंत परिसरातून २५ पोती कचरा जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 11:08 IST

सह्याद्रीच्या कुशीत अन् अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या चार भिंतीला ऐतिहासीक महत्त्व आहे. पण फिरायला येणाऱ्या काही तरुणांनी टाकलेल्या दारूच्या बाटल्या तसेच नागरिक खाद्यपदार्थांचे कागद टाकून विद्रूप झाला. येथील ऐतिहासिक वारसा स्वच्छता व संवर्धन मित्रमंडळाच्या वतीने तीन दिवस परिसराची स्वच्छता करुन तब्बल २५ पोती कचरा जमा केला.

ठळक मुद्दे चार भिंती परिसरात दारूच्या बाटल्यांचाही खच ऐतिहासिक वारसा स्वच्छता व संवर्धन मित्रमंडळाचा साताऱ्यात उपक्रम

सातारा : सह्याद्रीच्या कुशीत अन् अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या चार भिंतीला ऐतिहासीक महत्त्व आहे. पण फिरायला येणाऱ्या काही तरुणांनी टाकलेल्या दारूच्या बाटल्या तसेच नागरिक खाद्यपदार्थांचे कागद टाकून विद्रूप झाला. येथील ऐतिहासिक वारसा स्वच्छता व संवर्धन मित्रमंडळाच्या वतीने तीन दिवस परिसराची स्वच्छता करुन तब्बल २५ पोती कचरा जमा केला.ऐतिहासीक स्थळांची झालेली दयनिय अवस्था पाहावत नाही. तसेच त्याची निगा राखण्यासाठी पालिकेकडूनही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे येथील ऐतिहासिक वारसा स्वच्छता व संवर्धन मित्रमंडळाने चार भिंत स्वच्छतेचा उपक्रम राबविला.मोहिमेच्या पहिल्या दिवशी सकाळी सात ते दहा या वेळेत पायथा, पार्किंगसह मुख्य प्रवेश कमानीपर्यंत स्वच्छता करण्यात आली. त्यात सुमारे चार पोती कचरा जमा केला. दुसऱ्या दिवशी मुख्य कमान ते भिंतीच्या मध्यापर्यंत स्वच्छता करण्यात आली.

सुमारे साडेतीन तास चाललेल्या मोहीमेत आठ पोती कचरा व दारूच्या बाटल्या जमा केल्या. तिसऱ्या दिवशी मध्यवर्ती भिंत ते मुख्य स्मारक संपूर्ण भागाची स्वच्छता केली. या मोहीमेत २५ पोती कचरा व दोन पोती दारूच्या बाटल्या जमा केल्या. दारू पिऊन फोडलेल्या बाटल्यांचा हिशोबच नव्हता....आता चारभिंती संवर्धनावर लक्षसलग तीन दिवसांच्या अथक परिश्रमाने चारभिंती चकाचक करण्यात मित्रमंडळाला यश आले आहे. आता संवर्धन करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. संवर्धनासाठी लवकरच शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती मित्रमंडळाचे सर्वेसर्वा शुभम मांडवेकर यांनी दिली.मोहीमेत सहभागी सदस्यया मोहीमेत शुभम मांडवेकर, उत्कर्ष शिंदे, रोहन शेलार, प्रज्योत वडेट्टीवार, शुभम आवळे, अमेय कुलकर्णी, ओमकार कदम, सुरज देशमुख, निलेश शिंगाडे, अक्षय ताटे, अभिजीत मुरकुटे, अक्षय शेलार, ओमकार शिंदे, ऋषीकेश गायकवाड, रोहित ताटपुजे, विशाल मोहिते, अनिकेत कर्णे, साहिल पटेल, शुभम निकम यांनी सहभाग घेतला.कचरा पेटींची नासधूस, मित्रमंडळातर्फे पुन्हा डागडुजी 

चारभिंतीवर येणारे नागरिक खाद्यपदार्थ घेऊन येतात. तेथे भेळ किंवा अन्य पदार्थ खाऊन प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागदाचे गोळे टाकण्यासाठी पालिकेने कचराकुंडी ठेवलेली नाही. त्यामुळे मित्रमंडळातर्फे खोकी ठेवून कचरापेट्यांची व्यवस्था केली. पण काही विघ्नसंतोषी लोकांनी त्यांची नासधूस केल्याचे दिसून आले. मित्रमंडळातर्फे त्यांची पुन्हा डागडुजी करण्यात आली.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसर