सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदा जमाव जमवून प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढल्याप्रकरणी २५ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विश्वास बाबूराव मोरे (रा. वाघोली, ता. कोरेगाव), रुतुजा धर्मा शिंदे (रा. साखरवाडी, ता. फलटण), जयवंत अण्णा बनकर (रा. बिरोबा काॅलनी, लोणंद, ता. खंडाळा), अशोक शिंदे (रा. लोणंद, ता. फलटण) यांच्यासह २० ते २५ अनोळखी, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
रिमांड होममध्ये आत्महत्या केलेल्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरवून रिमांड होममधील प्रमुखांवर त्वरित गुन्हा दाखल करावा, तसेच मृत्यू झालेल्या मुलाच्या वडिलांना अटक केली असून, त्यांना पोलिसांनी सोडून द्यावे, या मागणीसाठी वरील संशयितांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. या सर्वांनी प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून प्रशासनाचे लक्ष वेधेल होते. याबाबत पोलीस शिपाई चेतन ठेपणे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.