शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळ्यात एटीएम सेंटरवर बरसली लक्ष्मी; काढले दोन हजार, मिळाले साडेतीन, पैसे काढण्यासाठी लोकांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 11:47 IST

बँक अधिकाऱ्यांना माहिती देऊनही व्यवहार सुरूच

खंडाळा (सातारा) : खंडाळा येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमवर दोन हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम काढल्यानंतर हजार ते दीड हजार रुपये अधिक रक्कम मिळत असल्याने अनेक ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे मकर संक्रांतीच्या सणाला एसबीआय बँकेचा सुपर धमाका सुरू असल्याची चर्चा ग्राहकांमध्ये होती.खंडाळा शहरातील राजवलीबाबा चौकात भारतीय स्टेट बँकेचे एटीएम सेंटर आहे. या सेंटरमध्ये दोन एटीएम मशीन आहेत. मात्र, त्यातील एका मशीनवर दोन हजारांपेक्षा जास्त रक्कम एटीएम कार्डद्वारे काढल्यास प्रत्यक्षात तीन ते साडेतीन हजार रुपये हातात पडत होते. ही बाब ग्राहकांच्या लक्षात आल्यानंतर पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी एटीएमकडे धाव घेतली. एकाचवेळी दहा हजार काढले तरी एक ते दीड हजार जास्त मिळत होते. त्यामुळे ज्यांना दहा हजार काढायचे होते. त्यांनी दोन हजार पाचवेळा व्यवहार करून अधिकचे पैसे मिळविले.वास्तविक जेवढी रक्कम काढली जात आहे तेवढीच रक्कम खात्यावरून कमी होत असल्याने ग्राहकांचे काहीच नुकसान नाही हे लक्षात आल्याने लोकांनी पैसे काढण्याचा धडाका सुरूच ठेवला. शहरात ही चर्चा फोनवरून एकमेकांना समजल्याने सर्वांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली. विशेषतः काहीजण स्वतःजवळ असणारे विविध एटीएम कार्ड घेऊन आले होते. काहीजण पैसे काढून तेथेच बंडल बनवून घेत होते. लोकांनी मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी लक्ष्मी पावल्याचा आनंद घेतला.

बँक अधिकाऱ्यांना माहिती देऊनही व्यवहार सुरूचशहरात ही बातमी पसरल्यावर काही सुज्ञ ग्राहकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना फोन करून याबाबत कल्पना दिली. मात्र, बँकेची वेळ संपून गेल्यावर असा प्रकार घडल्याने पैसे काढणे सुरूच होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरatmएटीएम