शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

जिल्ह्यातील आठ डेपोतून ३५९ जणांना १९७७ ब्रास वाळू - जिल्हाधिकारी  

By दीपक देशमुख | Updated: January 25, 2024 19:16 IST

ऑनलाईन पध्दतीने वाळूची नोंदणी झाल्यानंतर १५ दिवसांत वाळू डेपोतून वाळू घेऊन जाणे आवश्यक आहे.

सातारा: शासनाच्या धोरणानुसार प्रति ब्रास सहाशे रुपये इतक्या कमी दराने सर्वसामान्यांना वाळू मिळत असून आज अखेर ३५९ नागरिकांनी महाखनिज नोंदणी करुन योजनेचा लाभ घेतलेला आहे. वाई व कराड येथील एकुण वाळू डेपोंमध्ये एकूण २७७८ ब्रास वाळूची नोंदणी झालेली असून त्यापैकी १९७७ ब्रास वाळूचे वितरण केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.

जिल्ह्यामध्ये शासनामार्फत वाळू उत्खनन, वाहतूक व विक्री साठवणूक तसेच विक्री, व्यवस्थापन याबाबतचे सर्वकष धोरण राबविण्यात येत आहे. जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समितीने ऑनलाईन पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून वाई तालुक्यातील आसले, एकसर, पाचवड आणि वाई हे चार वाळू डेपो आणि कराड तालुक्यातील सुपने, इंदोली, घारेवाडी आणि खालकरवाडी हे चार वाळू डेपो अशा एकूण आठ वाळू डेपोंसाठी मंजूरी दिलेली आहे.

या वाळूडेपोंमध्ये १४१३ ब्रास वाळूसाठा उपलब्ध असुन नारिकांना महाखनिज प्रणालीवर वाळू मागणी बाबत नोंदणी करुन वाळू प्राप्त करुन घेता येईल. ऑनलाईन पध्दतीने वाळूची नोंदणी झाल्यानंतर १५ दिवसांत वाळू डेपोतून वाळू घेऊन जाणे आवश्यक आहे. वाळू डेपोपासून बांधकाम ठिकाणापर्यंत वाहतूक खर्च भरण्याची जबाबदारी ग्राहकाची असून वाळूची वाहतुकीसाठी वाहनांची व्यवस्था डेपोच्या ठिकाणी उपलब्ध केली आहे. सर्वसामान्यांनी शासनाच्या वाळू धोरण योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी  जितेंद्र डूडी यांनी आवाहन केले आहे. तसेच अवैध मार्गाने वाळू प्राप्त करुन घेऊ नये. वाळू नोंदणी संदर्भात काही अडचणी आल्यास संबंधित तहसिल कार्यालय किंवा गौणखनिज शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अशी करा नोंदणी वाळू खरेदीसाठीची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या  www.mahakhanij.maharashtra.gov.in या वेबसाईटवर किंवा तालुक्यातील सेतू केंद्रातून नोंद करणे आवश्यक आहे.   

आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन पध्दतीने वाळू मागणी नोंदविताना रेशनकार्ड, आधार कार्ड, घरकूल प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, इ. कागदपत्रे व मोबाईल क्रमांक अनिवार्य आहे.

टॅग्स :satara-acसातारा