फलटण तालुक्यात १९७ जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:40 AM2021-04-16T04:40:38+5:302021-04-16T04:40:38+5:30

फलटण : फलटण तालुक्यात गुरुवारी १९७ जणांची कोरोना चाचणी बाधित आली असून एका बधिताचा मृत्यू झाला आहे. यामुळे फलटण ...

197 affected in Phaltan taluka | फलटण तालुक्यात १९७ जण बाधित

फलटण तालुक्यात १९७ जण बाधित

Next

फलटण

: फलटण तालुक्यात गुरुवारी १९७ जणांची कोरोना चाचणी बाधित आली असून एका बधिताचा मृत्यू झाला आहे. यामुळे फलटण तालुक्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. गुरुवारी २०० च्या जवळपास रुग्णसंख्या आली आहे. ही बाब गंभीर असून चिंता वाढवणारी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

फलटण तालुक्यातील फलटण १९, रविवार पेठ ८, बुधवार पेठ १, शुक्रवार पेठ २, मंगळवार पेठ ३, आसू २, राजाळे १, जाधववाडी १, सासवड ३, कसबा पेठ ३, पाडेगाव २, तरडगाव ३, साखरवाडी ६, अलगुडेवाडी २, मलटण १७, विढणी ६, माळेवाडी १,फरांदवाडी २, निंभोरे ३, सोनवडी २, गिरवी ४, जावली ३, अरडगाव २, पिंप्रद १, काळूबाईनगर २, शिंदेवाडी, गणेशशेरी, मलवडी, जिंती, कापडगाव, आदर्की बु, निंबळक, ठाकूरकी प्रत्येकी १ तसेच शेऱ्याची वाडी ३, लक्ष्मीनगर ८, घाडगेवाडी १, खुंटे ५, गिरवी १, ताथवडा १, चव्हाणवाडी ८, तडवळे १, चांभरकरवाडी २, तांबवे २, हिंगणगाव २, जिंती नाका १, चौधरवाडी २, वाठार निंबाळकर २, चौधरवाडी १, सस्तेवाडी १, घाडगेमळा १, खराडेवाडी ३, काळज १, नांदल १, विठ्ठलवाडी १, माळेवाडी १, पाडेगाव २, मुळीकवाडी १, विद्यानगर ३, ठाकूरकी २, सोमनथळी ३, हडको १, तेली गल्ली ३, शिवाजीनगर १, गजानन चौक १, कपिल १, भडकमकरनगर १, मुंजवडी ३, निंबळक ४, सांगवी १, कोळकी २, धुळदेव १, ढवळेवाडी २, फडतरवाडी २, वडले १, पवारवाडी १, राजाळे १, जाधववाडी १, मठाचीवाडी १, कुसूर २, रविवार पेठ फलटण येथील ५३ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

तालुक्यात प्रथमच बाधितांची संख्या वाढत गेली आहे. शहरातील मलटन, बुधवार पेठ हे हॉट स्पॉट बनत चालले असून प्रशासनाने या भागात तातडीने उपाययोजना राबविण्याची गरज आहे.

चौकट

फलटण तालुक्यात गुरुवारी प्रथमच १९७ चा कोरोनाबधितांचा आकडा आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आपल्या पद्धतीने काम करीत असले तरी काही नागरिक अद्यापही बेफिकीरपणे वागत असून त्यामुळे बाधितांची संख्या वाढत चालली आहे. नागरिकांनी स्वतः खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: 197 affected in Phaltan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.