जिल्ह्यात १९३ नवे कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:45 AM2021-09-12T04:45:33+5:302021-09-12T04:45:33+5:30

सातारा : जिल्ह्यात शनिवारी १९३ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. ६ हजार ९४४ तपासण्यांमधून ...

193 new corona affected in the district | जिल्ह्यात १९३ नवे कोरोनाबाधित

जिल्ह्यात १९३ नवे कोरोनाबाधित

Next

सातारा : जिल्ह्यात शनिवारी १९३ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. ६ हजार ९४४ तपासण्यांमधून हे रुग्ण आढळले आहेत. तपासण्या निम्म्यावर आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

सातारा व फलटण तालुक्यात सर्वाधिक प्रत्येकी ४६ रुग्ण आढळले आहेत. कऱ्हाड २३, खंडाळा ५, खटाव २२, कोरेगाव १५, माण १७, महाबळेश्वर ४, पाटण २, वाई १३ असे आज अखेर एकूण २ लाख ४४ हजार ९४ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या खटाव १, माण १ व सातारा १ असे एकूण ३ असून, आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण ६ हजार १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या शनिवारी संध्याकाळपर्यंत २३६ जणांना घरी सोडण्यात आले असून, ९ हजार ५५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

Web Title: 193 new corona affected in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.