शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील १३० किलोमीटरमध्ये ३३९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:10 IST

दत्ता यादव। सातारा : जिल्ह्यातून १३० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग गेला असून, या मार्गावर २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत ...

दत्ता यादव।सातारा : जिल्ह्यातून १३० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग गेला असून, या मार्गावर २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत ३०१ अपघात झाले आहेत. त्यामध्ये तब्बल ३३९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केवळ ही दोन वर्षांतील आकडेवारी मन सुन्न करणारी आहे. जिल्हा प्रशासनाने महामार्गावर नेमके अपघात कुठे होतात, त्याची कारणे काय? हे शोधून काढले आहे. आता फक्त तातडीच्या उपाययोजनेची गरज आहे.पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग सातारा जिल्ह्यातून गेला आहे. शिरवळ (शिंदेवाडी) ते वाठार कºहाडपर्यंत हा महामार्ग तब्बल १३० किलोमीटरचा आहे. या मार्गावर सातत्याने अपघात होत असून, अनेकांचा नाहक जीव जात आहे. जिल्हा वाहतूक शाखेने महामार्गावरील अपघातांचा सर्व्हे केलाय. प्रत्येक स्पॉटवर जाऊन अपघातांचे बारकाईने अवलोकन केले आहे. नेमके अपघात कशामुळे झाले आहेत, या ठिकाणी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे, याची इत्यंभूत माहिती जमा करून पोलिसांनी अहवाल तयार केलाय. २०१६-२०१८ मधील हा अहवाल असून, आपल्या जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक मृत्युमुखी पडत आहेत, याचा कोणाला विश्वासही बसणार नाही. एका वर्षातील आकडेवारी अपघातांच्या मालिकांची भीषणत: दाखवत आहे. एका यंत्रणेने अपघाताचे स्पॉट शोधले, आता दुसºया यंत्रणेने त्यावर तातडीची उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा हा आकडा पुढील काही वर्षांत वाढला तर नवल वाटायला नको. त्यामुळे आत्तापासूनच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, बांधकाम विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने याची जबाबदारी आपल्यावर घेऊन भविष्यात जाणारे जीव वाचवावेत, एवढीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. कागदोपत्री अहवाल तयार करून तो एकमेकांना पाठविण्याचा शिष्टाचार शासकीय कार्यालयात आपल्याला अनेकदा पाहायला मिळतो; पण या लाल फितीच्या शिष्टाचारामुळे झटपट तोडगा निघत नाही. परिणामी केवळ आपल्यावरील जबाबदारी दुसºया विभागांवर ढकलण्याची पद्धत रुढ होत आहे. अशी ही पद्धत नागरिकांच्या जीवाशी तरी निगडित असणाºया गोष्टीत व्हायला नको, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने वाढत्या अपघातांविषयी सूचविलेल्या उपाययोजना यंदा तरी पूर्ण कराव्यात.सातारा जिल्ह्यातून जाणाºया महामार्गावर अपघातात कुठे अन् किती मयत झाले ?शिरवळ (शिंदेवाडी)-११, सातारा तालुक्यातील शेंद्रे कारखाना फाटा-१०, कºहाड तालुक्यातील पेरले फाटा-११, कोर्टी फाटा-१०, कºहाड तालुक्यातील मलकापूर फाटा-२३, वाई तालुक्यातील पाचवड नारायणवाडी फाटा-११, कºहाड तालुक्यातील वाठार फाटा (हॉटेल वैष्णवी)- १२ अशा प्रकारे महामार्गावर प्रवाशांचा जीव गेलाय. ही वारंवार अपघात होण्याची अत्यंत धोकादायक ठिकाणे आहेत. इतर ठिकाणीही अपघात होत आहेत. मात्र, त्या ठिकाणी वारंवार अपघात होत नाहीत, असे निदर्शनास आले आहे.महामार्गावर ११ पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन वर्षांत ३०१ अपघात झाले आहेत. त्यामध्ये ३३९ जणांचा मृत्यू झालाय. तसेच सातारा जिल्ह्याला जोडलेल्या राज्यमार्गावरही अपघातांची मालिका सुरूच आहे. या राज्यमार्गावर एकूण ९ पोलीस ठाण्यांची हद्द येते. दोन वर्षांत या मार्गावर ४७ अपघात झाले असून, यामध्ये एकूण ४९ जणांचा जीव गेलाय. इतर अपघातांमध्ये शहरातील रस्त्यांचा समावेश आहे. मात्र, शहरात अपघातात बळी पडण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पाच अपघातात सहाजण मृत्यू पावले आहेत.