महामार्गावरील १३० किलोमीटरमध्ये ३३९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 10:09 PM2020-03-01T22:09:50+5:302020-03-01T22:10:15+5:30

दत्ता यादव। सातारा : जिल्ह्यातून १३० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग गेला असून, या मार्गावर २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत ...

19 people die in 5 kilometers of highway | महामार्गावरील १३० किलोमीटरमध्ये ३३९ जणांचा मृत्यू

महामार्गावरील १३० किलोमीटरमध्ये ३३९ जणांचा मृत्यू

googlenewsNext

दत्ता यादव।
सातारा : जिल्ह्यातून १३० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग गेला असून, या मार्गावर २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत ३०१ अपघात झाले आहेत. त्यामध्ये तब्बल ३३९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केवळ ही दोन वर्षांतील आकडेवारी मन सुन्न करणारी आहे. जिल्हा प्रशासनाने महामार्गावर नेमके अपघात कुठे होतात, त्याची कारणे काय? हे शोधून काढले आहे. आता फक्त तातडीच्या उपाययोजनेची गरज आहे.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग सातारा जिल्ह्यातून गेला आहे. शिरवळ (शिंदेवाडी) ते वाठार कºहाडपर्यंत हा महामार्ग तब्बल १३० किलोमीटरचा आहे. या मार्गावर सातत्याने अपघात होत असून, अनेकांचा नाहक जीव जात आहे. जिल्हा वाहतूक शाखेने महामार्गावरील अपघातांचा सर्व्हे केलाय. प्रत्येक स्पॉटवर जाऊन अपघातांचे बारकाईने अवलोकन केले आहे. नेमके अपघात कशामुळे झाले आहेत, या ठिकाणी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे, याची इत्यंभूत माहिती जमा करून पोलिसांनी अहवाल तयार केलाय. २०१६-२०१८ मधील हा अहवाल असून, आपल्या जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक मृत्युमुखी पडत आहेत, याचा कोणाला विश्वासही बसणार नाही. एका वर्षातील आकडेवारी अपघातांच्या मालिकांची भीषणत: दाखवत आहे. एका यंत्रणेने अपघाताचे स्पॉट शोधले, आता दुसºया यंत्रणेने त्यावर तातडीची उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा हा आकडा पुढील काही वर्षांत वाढला तर नवल वाटायला नको. त्यामुळे आत्तापासूनच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, बांधकाम विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने याची जबाबदारी आपल्यावर घेऊन भविष्यात जाणारे जीव वाचवावेत, एवढीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. कागदोपत्री अहवाल तयार करून तो एकमेकांना पाठविण्याचा शिष्टाचार शासकीय कार्यालयात आपल्याला अनेकदा पाहायला मिळतो; पण या लाल फितीच्या शिष्टाचारामुळे झटपट तोडगा निघत नाही. परिणामी केवळ आपल्यावरील जबाबदारी दुसºया विभागांवर ढकलण्याची पद्धत रुढ होत आहे. अशी ही पद्धत नागरिकांच्या जीवाशी तरी निगडित असणाºया गोष्टीत व्हायला नको, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने वाढत्या अपघातांविषयी सूचविलेल्या उपाययोजना यंदा तरी पूर्ण कराव्यात.
सातारा जिल्ह्यातून जाणाºया महामार्गावर अपघातात कुठे अन् किती मयत झाले ?
शिरवळ (शिंदेवाडी)-११, सातारा तालुक्यातील शेंद्रे कारखाना फाटा-१०, कºहाड तालुक्यातील पेरले फाटा-११, कोर्टी फाटा-१०, कºहाड तालुक्यातील मलकापूर फाटा-२३, वाई तालुक्यातील पाचवड नारायणवाडी फाटा-११, कºहाड तालुक्यातील वाठार फाटा (हॉटेल वैष्णवी)- १२ अशा प्रकारे महामार्गावर प्रवाशांचा जीव गेलाय. ही वारंवार अपघात होण्याची अत्यंत धोकादायक ठिकाणे आहेत. इतर ठिकाणीही अपघात होत आहेत. मात्र, त्या ठिकाणी वारंवार अपघात होत नाहीत, असे निदर्शनास आले आहे.
महामार्गावर ११ पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन वर्षांत ३०१ अपघात झाले आहेत. त्यामध्ये ३३९ जणांचा मृत्यू झालाय. तसेच सातारा जिल्ह्याला जोडलेल्या राज्यमार्गावरही अपघातांची मालिका सुरूच आहे. या राज्यमार्गावर एकूण ९ पोलीस ठाण्यांची हद्द येते. दोन वर्षांत या मार्गावर ४७ अपघात झाले असून, यामध्ये एकूण ४९ जणांचा जीव गेलाय. इतर अपघातांमध्ये शहरातील रस्त्यांचा समावेश आहे. मात्र, शहरात अपघातात बळी पडण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पाच अपघातात सहाजण मृत्यू पावले आहेत.

Web Title: 19 people die in 5 kilometers of highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.