शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त मंडलाधिकाऱ्याच्या घरातून १७ तोळे सोने, पाच लाखांची रोकड चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 11:26 IST

काशीळ, ता. सातारा येथे निवृत्त मंडलाधिकाऱ्याचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १७ तोळ्याचे दागिने आणि पाच लाखांची रोकड असा सुमारे सात लाखांचा ऐवज चोरून नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली.

ठळक मुद्देनिवृत्त मंडलाधिकाऱ्याच्या घरातून १७ तोळे सोने, पाच लाखांची रोकड चोरीसकाशीळ येथील घटनेने खळबळ : पोलिसांकडून तपास सुरू

नागठाणे : काशीळ, ता. सातारा येथे निवृत्त मंडलाधिकाऱ्याचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १७ तोळ्याचे दागिने आणि पाच लाखांची रोकड असा सुमारे सात लाखांचा ऐवज चोरून नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली.याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुलाबमहमंद महिबुब भालदार (वय ६४) हे सेवानिवृत्त मंडलाधिकारी असून आपली पत्नी रमीजा यांच्यासोबत काशीळ, ता. सातारा येथे वास्तव्यास आहेत. त्यांना रशीद व सुलतान अशी दोन विवाहित मुले असून त्यापैंकी रशीद हा नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहे. शुक्रवार, दि. १२ जुलै रोजी ते आपल्या मुलास भेटण्यासाठी पत्नीसमवेत मुंबईला गेले होते.दरम्यान, बुधवारी सायंकाळी त्यांच्या घराचा दरवाजा काहींना उघडा दिसला. त्यामुळे त्यांनी भालदार यांना याची माहिती दिली. ते मुलासह परत मुंबईहून काशीळ येथे आले. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाट फोडून तब्बल १७ तोळ्याचे दागिने आणि पाच लाखांची रोकड असा सुमारे सात लाखांचा ऐवज गायब केल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. या प्रकारानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती बोरगाव पोलिसांना दिली.पोलिसांनी ठसे तज्ज्ञ तसेच श्वान पथकास पाचारण केले. मात्र, आक्षेपार्ह काही सापडले नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी घटनास्थळाची पाहणी करून चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राठोड हे करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर