शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -जिल्ह्यात नवीन १५९ कोरोना बाधित; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 13:37 IST

CoronaVirus Satara-सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून शुक्रवारी नवीन १५९ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांचा आकडा आता ६० हजार ४७६ वर पोहोचला. तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बळीची संख्या १ हजार ८६९ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात नवीन १५९ कोरोना बाधित; एकाचा मृत्यू

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून शुक्रवारी नवीन १५९ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांचा आकडा आता ६० हजार ४७६ वर पोहोचला. तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बळीची संख्या १ हजार ८६९ वर पोहोचली आहे.जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केल्यानुसार १५९ नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला. यामध्ये सातारा शहरात अधिक रुग्ण आढळून आले. तर तालुक्यातील नुने, शिवथर, वडूथ, पोगरवाडी, महागाव, सोनगाव आदी गावांत नवीन रुग्णांची नोंद झाली. कऱ्हाड शहराबरोबरच तालुक्यातील मलकापूर, कोरीवळे, सैदापूर येथे तसेच पाटण तालुक्यातील गोरेवाडी येथे रुग्ण आढळून आले.फलटण शहराबरोबरच तालुक्यातील कोळकी, जिंती, तरडगाव, मुरुम, चोपदारवाडी, आदर्की बुद्रुक, साखरवाडी, घाडगेवाडी, सासवड आणि गोखळी येथे तर खटाव तालुक्यातील खटाव, कातरखटाव, वडूज, बनपुरी, पुसेगाव, निमसोड गावांत नवीन रुग्ण स्पष्ट झाले.माण तालुक्यातील जाशी, म्हसवड, गटेवाडी येथे तर कोरेगाव शहरासह तालुक्यातील सातारारोडला कोरोना रुग्ण समोर आले. खंडाळा तालुक्यातील शिरवळ, शिंदेवाडी, पारगाव, लोणंद, आसवली, पाचवड, धनगरवाडी, सांगवी येथे तसेच वाई, जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातही नवीन काही रुग्णांची नोंद झालेली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात कऱ्हाड येथील ६८ वर्षांच्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूSatara areaसातारा परिसर