शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

बोगस डोंगरी प्रमाणपत्रप्रकरणी १५ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 17:02 IST

बनावट डोंगरी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी प्रवीण सुरेश मसुरे (वय २८, रा. सावरगाव, ता. देदणी, जि. लातूर) याला न्यायालयाने एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर १५ हजार रुपयांच्या बॉण्डची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देबोगस डोंगरी प्रमाणपत्रप्रकरणी १५ हजारांचा दंडभाड्याने खोली न दिल्याने मालकावर चाकूने वार

सातारा : बनावट डोंगरी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी प्रवीण सुरेश मसुरे (वय २८, रा. सावरगाव, ता. देदणी, जि. लातूर) याला न्यायालयाने एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर १५ हजार रुपयांच्या बॉण्डची शिक्षा सुनावली.प्रवीण मसुरे याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे डीएड या शैक्षणिक प्रशिक्षणासाठी बनावट डोंगरी प्रमाणपत्र सादर करून प्रवेश मिळवला होता. याबाबत महात्मा फुले जुनियर कॉलेज आॅफ एज्युकेशन सातारचे प्राचार्य शहाजी रंगनाथ डोंगरे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार २४ जून २००९ रोजी त्याला अटक करण्यात आली होती.

दरम्यान, त्याची जामिनावर सुटका झाली होती. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. एम. कोरे यांनी या घटनेचा तपास करून १ आॅक्टोबर २०११ मध्ये न्यायालयात त्याच्याविरोधात दोषारोप पत्र सादर केले होते. शहाजी रंगनाथ डोंगरे आणि किनवट पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी बलदेव सिंह चव्हाण या दोघांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. एस. मडके यांनी प्रवीण सुरेश मसुरे याला एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या १५ हजार रुपयांच्या बॉण्डची शिक्षा सुनावली. सरकारी वकील पुष्पा जाधव यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल विद्या कुंभार, वैभव पवार, जयश्री माळी यांनी सहकार्य केले.

संगमनगर येथे जुगार अड्ड्यावर छापा, सहाजणांना अटक : २० हजारांचा ऐवज जप्तसातारा येथील संगमनगरमधील झोपडपट्टीतील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला जुगार खेळताना शहर पोलिसांनी छापा टाकून सहाजणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे २० हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.बिभीषण लक्ष्मण कांबळे (वय ३८, प्रतापसिंह नगर खेड), प्रमोद उर्फ राजेंद्र बापुसो पोतेकर (वय २९, रा. गुरूदत्ता कॉलनी, संगमनगर सातारा), शंकर हणमंत होसमने (वय ३२, रा. संगममाहुली फाटा परिसर), सोमनाथ शंकर कांबळे (वय ५८, रा. चाहुर, खेड), नीलेश सदाशिव शिंदे (वय कृष्णानगर सातारा), जवाहर लक्ष्मण गायकवाड (वय ३८,रा. प्रतापसिंहनगर, खेड सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 हे सर्वजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे तत्काळ छापा टाकला. यावेळी काहीजणांनी तेथून पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले. पकडलेल्या सहाजणांकडून ३ हजार ८०० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य, मोबाईल असा सुमारे २० हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

पत्नीस आत्महत्येस प्रवत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. दशरथ उर्फ संतोष बबन भंडारे (रा. शिवथर, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी, विवाहिता सारिका भंडारे हिच्या चारित्र्याचा संशय घेऊन पती दशरथ हा वारंवार मारहाण करत होता.

जेवण चांगले का बनविले नाहीस, असे म्हणून दि. २५ रोजी त्याने पुन्हा भांडण काढले. या त्रासाला कंटाळून सारिकाने घरात असलेले डिझेल अंगावर ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. यात सारिका गंभीर भाजून जखमी झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.याप्रकरणी सारिकाचे वडील दिलीप गवळी (रा. मुंबई) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पती दशरथ भंडारेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला.

भाड्याने खोली न दिल्याने मालकावर चाकूने वार भाड्याने खोली न दिल्याने दोघांनी मालकाचा चाकूने वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजता शाहूनगर येथे घडली. जखमी घरमालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूनगर येथील हिलटॉप कॉलनीमधील राजाराम नेवसे यांच्या बंगला आहे. त्यांच्या बंगल्यामध्ये दोन खोल्या भाड्याने द्यायच्या असल्याबाबची माहिती निशांत बर्गे व प्रवीण निंबाळकर यांना मिळाली. त्यामुळे हे दोघे रूम भाड्याने घेण्यासाठी हिलटॉप कालनीत गेले. त्यावेळी घरमालक राजाराम नेवसे यांनी भाड्याने घर घेण्यासाठी आलेल्या निंशात बर्गे व प्रवीण निंबाळकर यांच्याकडे त्यांची पूर्ण माहिती विचारण्यात सुरूवात केली. त्यावेळी या दोघांनी अर्धवट माहिती दिली.

बाकीची माहिती सांगण्यास नकार दिला. त्यामुळे घरमालक राजाराम नेवसे यांनी खोली पाहण्यासाठी चावी दिली नाही. यामुळे चिडलेल्या दोघांनी नेवसे यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. ह्यतुला जिंवत ठेवणार नाही,ह्ण असे म्हणत त्यांच्या मानेवर, डोक्याच्या बाजूस चाकूने वार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या प्रकारानंतर निशांत बर्गे व प्रवीण निंबाळकर हे दोघे पळून गेले. याबाबत राजाराम नेवसे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बर्गे आणि निंबाळकरवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर