शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रमुख धरणांत १४५ टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 13:21 IST

सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप असलीतरी सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांमध्ये १४५.४८ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. यामधील तारळी धरण पूर्णपणे भरले असून बलकवडीत ९४ टक्के साठा आहे. इतर चार धरणांत ९७ टक्क्यांच्यावर पाणीसाठा झालेला आहे. दरम्यान, धरण परिसात अत्यल्प पाऊस असून तीन धरणांतून विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील प्रमुख धरणांत १४५ टीएमसी पाणीसाठा तारळी १०० टक्के भरले : क्षेत्रात अत्यल्प पाऊस; तीन धरणांतून विसर्ग सुरू

सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडीप असलीतरी सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांमध्ये १४५.४८ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. यामधील तारळी धरण पूर्णपणे भरले असून बलकवडीत ९४ टक्के साठा आहे. इतर चार धरणांत ९७ टक्क्यांच्यावर पाणीसाठा झालेला आहे. दरम्यान, धरण परिसात अत्यल्प पाऊस असून तीन धरणांतून विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पाच महिने पाऊस झाला. त्यामुळे आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच धरणे फुल्ल झाली होती. त्यानंतर पाऊस होत राहिल्याने पिकांसाठी पाण्याची मोठी मागणी झाली नाही. परिणामी यावर्षी उन्हाळ्यातही धरणांमध्ये चांगला पाणीसाठा टिकून राहिला होता. त्यातच जून महिन्यात मान्सूनच्या पावसालाही वेळेवर सुरूवात झाली.

काही दिवस धंवाँधार पाऊस पडला. त्यामुळे धरणांमध्येही वेगाने पाणीसाठा वाढू लागला. पण, त्यानंतर पावसाने उघडीप घेतली. जुलै महिन्यात तर कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी धरणे भरणार का अशी चिंताही निर्माण झाली होती. पण, आॅगस्ट महिना सुरू झाल्यापासून चांगला पाऊस होण्यास सुरूवात झाली. पश्चिम भागात तर काही दिवस धुवाँधार पाऊस पडला. यामुळे कोयना, धोम, बलकवडी, उरमोडी, कण्हेर, तारळीसारख्या धरणांत वेगाने पाणीसाठा वाढला. त्यातच पाऊस सुरू असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला.जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी या प्रमख सहा धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सध्यस्थितीत या धरणांमध्ये १४५.४८ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. धरणे भरण्यासाठी जवळपास सव्वातीन टीएमसी पाण्याची आवश्यता आहे. त्यातच या धरण परिसरातही सध्या अत्यल्प पाऊस होत आहे.

रविवारी सकाळपर्यंत धोमला अवघा एक मिलिमीटर पाऊस झाला. तर बलकवडी ५ आणि तारळी धरणक्षेत्रात ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर कोयना, उरमोडी, कण्हेर येथे पावसाची नोंद झाली नाही.जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)धरणे           यावर्षी         टक्केवारी        एकूण क्षमता

  • धोम            १३.२२             ९७.९५           १३.५०
  • कण्हेर          ९.९५               ९८.४९           १०.१०
  • कोयना        १०२.७७            ९७.६४          १०५.२५
  • बलकवडी       ३.८३             ९३.९१           ४.०८
  • उरमोडी         ९.८६              ९९.००          ९.९६
  • तारळी           ५.८५             १००.००         ५.८५

 

टॅग्स :DamधरणKoyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर