शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उदयनराजे गटाच्या १४ संचालकांचे राजीनामे

By admin | Updated: November 17, 2016 23:18 IST

अजित पवारांमुळे वाताहत : बाजार समिती, खरेदी-विक्री संघांत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा उदयनराजेंचा आरोप

सातारा : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा बाजार समिती, तालुका व जिल्हा खरेदी-विक्री संघातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थक असणाऱ्या १४ संचालकांनी गुरुवारी आपले राजीनामे दिले. या संस्थांमध्ये झालेल्या कोट्यवधींच्या भ्रष्टाचार झाल्यामुळेच माझ्या विचाराच्या संचालकांनी राजीनामे दिल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अजित पवार यांच्यामुळेच राज्याची वाताहत झाल्याचा आरोप करून त्यांच्यासह इतर नेत्यांच्या भ्रष्टाचाराची फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाबून ठेवल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. खा. उदयनराजे म्हणाले, ‘माझ्या विरोधात आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. वास्तविक २५ वर्षांपासून मीच सांगत आलोय की, भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. माझा स्वत:चा भाऊ जरी असला तरी मी तत्त्वाशी बांधील असल्याने मी समाजाशिवाय दुसरा विचारच करत नाही. सातारा बाजार समितीमधील भ्रष्टाचाराबाबत तक्रार केल्यानंतर सहकार विभागाने याची चौकशी केली. बाजार समितीत कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल चौकशी अधिकाऱ्यांनी दिला आहे. या अधिकाऱ्यांनी बँकेचे तत्कालीन सभापती राजू भोसले, सतीश चव्हाण, किरण साबळे-पाटील, व्यापारी संजय झंवर यांना वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. या सर्वांनी निविदा न काढता बाजार समितीची जागा २८ वर्षांच्या करारावर देऊन टाकली आहे. आता सहकार विभागाने बाजार समितीवर प्रशासक नेमून संचालक मंडळाच्या खासगी मालमत्तेवर जप्ती आणावी, अशी मागणी मी केली आहे.’ ज्यांना ही नोटीस बजावली आहे, ते सर्वजण आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जवळचे आहेत. या भ्रष्टाचाराची माहिती जर त्यांना नसेल तर मोठा विनोद होईल, अशी टीकाही खासदार उदयनराजेंनी यावेळी केली. (प्रतिनिधी) ... तर आम्ही वाटून खाल्ले असते ‘तालुका, जिल्हा खरेदी-विक्री संघात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशीची मागणी आपण करणार आहे. या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आपल्याकडे असून, मी ती चौकशी अधिकाऱ्यांना सादर करेन. माझ्यावर आरोप करणाऱ्या शिवेंद्रसिंहराजेंनी ध्यानात घ्यावे की मला टक्केवारीच खायची असती तर तुमच्याशी मिळते जुळते घेऊन वाटून खाल्ले असते,’ असे वक्तव्येही खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिला.