शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील ९ नगरपालिकांतील २३३ पैकी १३९ जागा खुल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:12 IST

सातारा पालिकेत होणार ५० नगरसेवक

सातारा : जिल्ह्यातील ९ नगरपालिकांच्या २३३ जागांसाठी बुधवारी आरक्षण सोडत झाली. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी (महिलांसह) १३९ जागा असून, ओबीसींसाठी ६० तर अनुसूचित जाती ३२ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २ जागा राखीव झाल्या आहेत. जिल्ह्यात सातारा नगरपालिका मोठी असून, येथे एकूण ५० नगरसेवक जागांसाठी आरक्षण सोडत झाली.जिल्ह्यातील सातारा, कराड, मलकापूर, म्हसवड, रहिमतपूर, फलटण, वाई, महाबळेश्वर आणि पाचगणी या ९ नगरपालिकांची मुदत चार वर्षांपूर्वी संपली आहे. त्यामुळे या पालिकांवर प्रशासक राजवट आहे. दोन दिवसांपूर्वी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले होती. तर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका कार्यक्षेत्रात प्रभागांची आरक्षण सोडत बुधवारी सकाळी ११ वाजता काढण्यात आली. एकूण ११५ प्रभागांसाठी हे आरक्षण होते.

असे आहे, जातनिहाय आरक्षण..जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी एकूण २३३ नगरसेवकांना निवडून द्यायचे आहे. खुल्या प्रवर्गातून १३९ जण (महिलांसह) नगरसेवक होणार आहेत. यामध्ये सातारा पालिकेत २९, मलकापूरला १३, म्हसवड १२, रहिमतपूर १३, कराड १९, फलटण १५, वाई १५, महाबळेश्वर १२ आणि पाचगणीत ११ जणांना संधी मिळणार आहे. अनुसूचित जाती (महिलांसह) प्रवर्गातून ३२ नगरसेवक होणार आहेत. सातारा पालिकेत ६, वाई, मलकापूर आणि म्हसवड प्रत्येकी ३, रहिमतपूर २, कराड ४, फलटणला ५ जणांना संधी मिळेल.अनुसूचित जमातीसाठी सातारा आणि महाबळेश्वर येथे प्रत्येकी एक जागा आरक्षित आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गात महिलांसह (ओबीसी) ६० जागा आरक्षित झाल्या आहेत. सातारा पालिकेत १४, मलकापूर ६, वाई, म्हसवड, रहिमतपूर, महाबळेश्वर आणि पाचगणीला प्रत्येकी ५, कराडला ८, फलटण ७ जागा राखीव आहेत.

मेढा नगरपंचायतीसाठी १७ नगरसेवक..मेढा नगरपंचायतीचीही सार्वत्रिक निवडणूक नगरपालिकांसोबत होणार आहे. एकूण १७ नगरसेवकांना निवडून द्यायचे आहेत. खुल्या प्रवर्गातून ९, ओबीसी ५, अनुसूचित जाती २ आणि अनुसूचित जमातीमधून एक जणाला निवडून द्यायचे आहे.