शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या हळद व्यापाऱ्याकडून आणखी १२ शेतकऱ्यांना गंडा; जांबच्या शेतकऱ्यांची १२ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2022 14:21 IST

जांबमधील १२ शेतकऱ्यांकडून सारडा याने हळद खरेदी करून त्याने त्याचे पैसे परत केले नाहीत.

- दत्ता यादव

सातारा: सातारा तालुक्यातील ११ शेतकऱ्यांना ३२ लाखांना गंडा घालणाऱ्या सांगलीच्या हळद व्यापाऱ्याने वार्इ तालुक्यातील जांब या गावातील आणखी १२ शेतकऱ्यांची १२ लाख ८३ हजार ८९७ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भुर्इंज पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

राजकुमार रमेशचंद्र सारडा (मूळ रा. महावीर नगर, गुजराथी हायस्कूल जवळ सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या हळद व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीचा हळद व्यापारी राजकुमार सारडा याने सातारा तालुक्यातील मर्ढे येथील ११शेतकऱ्यांची तब्बल ३२ लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला  असतानाच आता जांबच्या शेतकऱ्यांनीही भुर्इंज पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

जांबमधील १२ शेतकऱ्यांकडून सारडा याने हळद खरेदी करून त्याने त्याचे पैसे परत केले नाहीत. अशा प्रकारे त्याने या शेतकऱ्यांची  १२लाख ८३ हजार ८९७ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले.  जांबमधील शेतकरी शंकर तुकाराम शिंदे यांनी सर्व १२ शेतकऱ्यांच्या वतीने भुर्इंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत हवालदार एस.एम. तोडरमल हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, हा तक्रारींचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘त्याचे’ अजूनही येतायत शेतकऱ्यांना फोन

सांगलीचा हळद व्यापारी राजकुमार सारडा याच्याविरोधात पन्नासहून अधिक शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. एकीकडे पोलीस त्याचा  शोध घेतायत. तर दुसरीकडे तो अद्यापही सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फोन करून ‘मी तुमचे पैसे देतो, पोलीस ठाण्यात जाऊ नका,’ अशी विनंती करत आहे. असे असताना तो पोलिसांना कसे सापडत नाही, असा प्रश्नही शेतकऱ्यांमधून  उपस्थित केला जात आहे.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfraudधोकेबाजी