शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची ११५ कोटींची भरपाई, पाच वर्षांतील सर्वात मोठी रक्कम

By नितीन काळेल | Updated: July 4, 2024 19:05 IST

सवा दोन लाख लाभार्थी : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामासाठी मदत 

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. त्यामुळे खरीप हंगामाला फटका बसला होता. यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे सवा दोन लाख शेतकऱ्यांना ११५ कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. हे पैसे संबंधितांच्या बॅंक खात्यावरही वर्ग झालेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पावसातील खंड, ढगफुटी, चक्रीवादळ आदी कारणाने पिकांचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरावी लागत होती. तर राज्य आणि केंद्र शासन बाकीचा भार उचलत होते. मात्र, गेल्यावर्षीपासून राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली. शेतकरी एक रुपया भरुन योजनेत समाविष्ट होत आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी खरीप हंगामात एक रुपयाची योजना सुरू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील पावणे तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. पावसाच्या वार्षिक सरासरीनेही १०० टक्क्यांचा पल्ला गाठला नव्हता. तसेच सर्वच तालुक्यात पाऊस कमी होता. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फटका बसलेला. त्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळत आहे. जिल्ह्यातील २ लाख २७ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर पीक नुकसान भरपाईपोटी ११५ कोटी रुपये जमा झाले आहेत. विविध पिकांच्या नुकसानीसाठी ही भरपाई रक्कम देण्यात आलेली आहे. त्यामुळे पीक विमा योजनेचा जिल्ह्यातील सवा दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाल्याचे दिसून येत आहे.

पाच वर्षांतील सर्वात मोठी भरपाई रक्कम..जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये २०२३ मधील खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी मिळालेली रक्कम सर्वाधिक आहे. २०१९-२० वर्षात ७४ हजार १४० शेतकरी योजनेत सहभागी झाले होते. त्यावेळी नुकसानीसाठी ७ कोटी ६१ लाख रुपये हे ३१ हजार ५५७ शेतकऱ्यांना मिळालेले. २०२०-२१ मध्ये २४७ शेतकऱ्यांना ६ लाख रुपये मिळाले होते. तर २०२१-२२ वर्षात १६६ शेतकऱ्यांना ५ लाख तर २०२२-२३ वर्षात ४९४ शेतकऱ्यांना ९ लाखांची भरपाई मिळालेली. २०२३ च्या खरीप हंगामात २ लाख ७६ हजार शेतकरी विमाधारक होते. त्यातील २ लाख २७ हजार शेतकऱ्यांना ११५ कोटी मिळालेले आहेत.

निसर्गाचा लहरीपणा वारंवार अनुभवास येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत होणाऱ्या नुकसानीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घ्यावा. यासाठी एक रुपया भरावा लागणार आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. गेल्यावर्षीच्या पीक नुकसानभरपाई अंतर्गत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ११५ कोटी रुपये वर्ग झाले आहेत. यावर्षीही शेतकऱ्यांनी या योजनेत १५ जुलैपूर्वी सहभाग घ्यावा. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीbankबँक