शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेअर्सची माहिती देण्याच्या आमिषाने साताऱ्यातील डाॅक्टरला ११ लाखांना गंडा, तिघांवर गुन्हा दाखल

By दत्ता यादव | Updated: February 13, 2024 17:55 IST

सातारा : शेअर्सची माहिती देऊन त्यामधून जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याच्या आमिषाने डाॅ. कपील जयवंत ठोकपे (वय ३६, रा. मनोकमल, सदर बझार, ...

सातारा : शेअर्सची माहिती देऊन त्यामधून जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याच्या आमिषाने डाॅ. कपील जयवंत ठोकपे (वय ३६, रा. मनोकमल, सदर बझार, सातारा) यांची तब्बल ११ लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाणी मिश्रा, आर्यन रेड्डी, वैष्णवी एंटरप्रायजेस, रवीकपूर (रा. फरीदाबाद, उत्तर प्रदेश), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डाॅ. कपील ठोकपे यांना वरील संशयितांनी एका व्हाॅट्सअँप ग्रुपमध्ये अॅड करून घेतले. या ग्रुपमधून कोणता शेअर्स विकत घ्यायचा, कोणता विक्री करायचा याची माहिती देऊन त्यामधून जास्तीत जास्त फायदा मिळतो, असे त्यांना सांगितले. त्यानंतर संशयितांनी डाॅ. ठोकपे यांना एक लिंक पाठवून अकाउंट काढण्यास सांगितले. त्यामधून रिटेल होम या नावाचे अॅप्लिकेशन इन्सस्टाॅल अकाउंट काढण्यास सांगितले. 

त्यामध्ये डाॅ. ठोकपे यांनी सुरुवातीला १७ जानेवारी २०२४ रोजी १ लाख रुपये पाठवले. त्यानंतर २४ जानेवारी रोजी आरटीजीएसद्वारे १० लाख रुपये असे एकूण ११ लाख रुपये वैष्णवी एंटरप्रायजेस यांच्या फरीदाबाद शाखेमध्ये पाठविले. त्यानंतर काही दिवसांतच संशयितांनी डाॅ. ठोकपे यांचे अँप्लिकेशनमधून लाॅगीन बंद केले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे डाॅ. ठोकपे यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी दि. १२ रोजी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी