शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पशुगणनेसाठी १५ दिवसांची मुदतवाढ, सातारा जिल्ह्यात किती जनावरे.. जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: March 31, 2025 19:41 IST

सातारा : जिल्ह्यातील पशुगणना अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत १ हजार ९०० गावात मोहीम पूर्ण झाली आहे, तर ८८ गावांतील ...

सातारा : जिल्ह्यातील पशुगणना अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत १ हजार ९०० गावात मोहीम पूर्ण झाली आहे, तर ८८ गावांतील गणना बाकी आहे. तरीही पशुगणनेसाठी केंद्र शासनाने आणखी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गणना वेळेपूर्वीच पूर्ण होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास ११ लाख पशुधनाची नोंद झाली आहे.केंद्र शासनाच्यावतीने दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते. यंदा प्रथमच ऑनलाइन पशुगणना होत आहे. यामध्ये १६ प्रजातींची नोंद करण्यात येत आहे. गाय, बैल, म्हैस, रेडे, शेळी, मेंढी, घोडा, गाढव, कुत्रा, मांजर, डुक्कर आदी पशुधन तसेच कोंबड्यांचीही गणना केली जात आहे. यातील काही पशूंची मात्र, प्रथमच गणना होत आहे. त्यातच शासनाच्या निर्णयानुसार २५ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी अशी पशुगणना करण्यात येणार होती; पण, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता होती. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर पशुगणनेला सुरुवात झाली. परिणामी, या मोहिमेला उशीर झाला. तसेच एक महिन्याची मुदतवाढही देण्यात आली होती. ३१ मार्चअखेर ही मुदत होती. पण, देशातील अनेक राज्यात पशुगणना धीम्या गतीने असल्याने पुन्हा मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता १५ एप्रिलपर्यंत पशुगणना पूर्ण करावी लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAnimalप्राणी